ऑनलाइन विशेष सभेचे आयोजन... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 26, 2020

ऑनलाइन विशेष सभेचे आयोजन...

 ऑनलाइन विशेष सभेचे आयोजन...

मनपा स्वीकृत सदस्यांची 1 ऑक्टोबरला निवड.

अहमदनगर ः स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीनेच सभा होणार आहे.
मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस न झाल्याने सदस्य निवड रखडली होती. आता पुन्हा सभा काढण्यात आली आहे. मात्र, मागील वेळेस राबविण्यात आलेली आयुक्तांकडे नावे व कागदपत्रे सादर करण्याची पध्दत यावेळी राबविणार का, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान स्वीकृत सदस्य निवडीत शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 व भाजपचा 1 सदस्य असे 5 सदस्य निवडले जाणार आहेत.


No comments:

Post a Comment