अरणगावात फडकला मनसेचा ध्वज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2020

अरणगावात फडकला मनसेचा ध्वज

  अरणगावात फडकला मनसेचा ध्वज

मोठे व प्रेरणादायी काम मनसेचे युवक करतील-वर्मा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अरणगाव येथील तरूणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच गाव पातळीवर पक्षाचं काम सुरू करण्यात आले. याचा पहिला पाया गावात पक्षाचा सर्वात मोठा झेंडा लाऊन मानवंदना देण्यात आली.  


   यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ सचिव नितीन भुतारे, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, मनविसे तालुका उपाध्यक्ष संकेत जरे, योगेश गुंड, शहर उपाध्यक्ष स्वप्निल वाघ, अनिकेत जाधव, राहुल फुलारे,  सुरेश शिंदे, वैभव कल्हापुरे, शुभम साबळे, मारूती विटेकर, प्रविण कर्डीले, संतोष भालेकर, चंद्रकांत कार्ले व असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
  याप्रसंगी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा म्हणाले, मनसे आणि राज साहेबांवर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, मराठी माणसाच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहणार. हा झेंडा पक्षाची ओळख तयार करेल आणि या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंचे विचार घरोघरी पोहचवण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक प्रयत्नशील राहतील. अरणगावातून या झेंड्याची सुरुवात झाली आहे. या झेंड्याप्रमाणेचे मोठे व प्रेरणादायी काम मनसेचे युवक करतील. पुढील काळात असे झेंडे गावोगावी लावणार आहोत. त्याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविणार आहोत. आज अनेक युवक मनसेमध्ये सामिल होऊन पक्षाचे काम करत आहे, त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना दिशा देण्याचे काम पक्ष करेल असे सांगितले.

No comments:

Post a Comment