कुकडीच्या स्वतंत्र कार्यालयाचा फायदाच होणार ः आ. पाचपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

कुकडीच्या स्वतंत्र कार्यालयाचा फायदाच होणार ः आ. पाचपुते

 कुकडीच्या स्वतंत्र कार्यालयाचा फायदाच होणार ः आ. पाचपुते

स्वतंत्र कार्यालयाचा फायदाच होणार-आ. पाचपुते
  कुकडीचे कार्यालय विभक्त झाल्यामुळे श्रीगोंद्याच्या हक्काच्या पाण्याला न्याय भेटणार आहे कारण यापूर्वी कर्जत च्या काही भागाचे पाण्याची गणना हि श्रीगोंद्याच्या पाण्यात होत होती त्यामुळे यापुढे श्रीगोंदा तालुक्याला फायदा होणार असल्याचे पाचपुते म्हणाले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कुकडीचे कार्यालय श्रीगोंदा तालुक्यासाठी स्वतंत्र पाहिजे, ही आपली जुनीच मागणी होती. फक्त त्यावर आता अंमलबजावणी झाली आहे. पण स्वतंत्र कार्यालय असल्यावर श्रीगोंदा तालुक्याच्या पाणी वाटपाला निश्चितच फायदा होणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.
कर्जतसाठी कुकडीचे स्वतंत्र कार्यालय होणार आहें त्यामुळे श्रीगोंद्याचे महत्व कमी होईल अशी शक्यता अजिबात नाहीं उलट पाणी वाटपाच्या वेळेस श्रीगोंद्याला नक्कीच फायदा होणार आहे. कारण सध्या श्रीगोंदा कार्यालयाच्या अंतर्गत कर्जत तालुक्यातील येसवडी चारी व राशीनचा भाग येत आहे. पाणीवाटपाच्या वेळेस या चार्‍यांची गणना श्रीगोंद्याच्या हद्दीत होत होती त्यामुळे पाणी वाटपाला अडचणी येत होत्या पण आता कर्जतसाठी स्वतंत्र कार्यालय होत असल्यामुळे श्रीगोंद्याचा भार कमी होणार आहे व मुख्य वितरिका क्रमांक 14च्या खालील भाग कर्जतला जोडला जाणार आहे व आपल्या तालुक्याच्या हद्दीतील भाग श्रीगोंदा कार्यालयाच्या अंतर्गत येणार आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्याचा काही भाग कुकडी 70 ते 110 किलोमीटरपर्यतचा भाग नारायणगाव कार्यालयाला जोडला आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या काही भागातील शेतकर्‍यांना नारायणगाव कार्यालयाला जाणे अवघड होत आहे म्हणून हा भागही श्रीगोंदा कार्यालयाला जोडणे गरजेचे आहे. ही मागणी आपण पूर्वीपासूनच केलेली आहे आता त्या मागणीवर अंमलबजावणी सुरु झाली आहे, असे पाचपुते म्हणाले.

No comments:

Post a Comment