निम फौंडेशनतर्फे कोरोना योध्द्यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

निम फौंडेशनतर्फे कोरोना योध्द्यांचा सन्मान

 निम फौंडेशनतर्फे कोरोना योध्द्यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खर्डा  ः येथे निम फौंडेशन या सामाजिक संघटनेच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान  करण्यात आला. आ. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयसिंह गोलेकर होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खर्डा प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र हांगे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा ताई, आरोग्य सेविका,  महसूल विभागाचे कुलकर्णी व कर्मचारी, ग्रामपंचायतचे सातपुते, सरपंच संजय गोपाळघरे व सर्व कर्मचारी, पोलिस विभागाचे साखरे व सर्व कर्मचारी, 108 रुग्णवाहिकीचे कर्मचारी, सफाई कामगार, खर्डा येथील सर्व पत्रकार बांधव, वीज बोर्डाचे कर्मचारी, सर्व डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात आला.
निम या समाजसेवी संस्थेच्यावतीने अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम घेण्यात येतात.
यावेळी  विजयसिंह गोलेकर  यानी निम फौंडेशनने केलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमाची माहिती दिली. फौंडेशनच्यावतीने केलेली विविध विकासकामे व सीतारामगड, खर्डा व गिते बाबा मंदिर येथे सिमेंट बाक  हे फौंडेशनच्या माध्यमातून  दिल्याचे सांगितले.
कोरोंना योद्धा हा सन्मान मिळाल्याने आम्ही भारावून गेलो, अशी प्रतिक्रिया काँस्टेबल साखरे यांनी दिली.
यावेळी अवीशेठ शहा, अजित कांकरिया, भैय्या शहा, चंद्रकांत गोलेकर, श्रीकांत लोखंडे, हनुमंत कोरे, कल्याण सुरवसे, तुळशीदास गोपाळघरे, राजेंद्र नागरगोजे,  महालिंग कोरे, वैभव जमकावले, विष्णु थोरात, इंगोले उपस्थित होते.
फौंडेशन वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभागी होत असते व समाजाची बांधिलकी असते. सतत वेगवेगळी कामे करून लॉकडाऊनमध्ये गावातील दोनशे ते अडीचशे जणांना दहा ते पंधरा दिवसाचा किराणा वाटप केला व व स्मशानभूमी येथे उत्तम काम करून साफसफाई करून व वेळोवेळी चांगली कामगिरी करत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील गोलेकर यांनी, प्रास्ताविक प्रा. हनुमंत कोरे यांनी तर आभार डॉ. नागरगोजे  यांनी केले.

No comments:

Post a Comment