कळमकरवाडी येथील एलदरा तलाव ओव्हरफ्लो - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

कळमकरवाडी येथील एलदरा तलाव ओव्हरफ्लो

 कळमकरवाडी येथील एलदरा तलाव ओव्हरफ्लो

ग्रामस्थांनी केले जलपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील कळमकरवाडी येथील एलदरा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने त्याचे जलपूजन राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांच्या हस्ते पार पडले.
विक्रमसिंह कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशन व जलयुक्त शिवार या योजना  यशस्वीपणे राबवल्याने कळमकरवाडी पाणीदार झाली आहे. 2018 व 19 मध्ये पाणी फौंडेशन स्पर्धेत सहभाग घेऊन तालुक्यात दोन्ही वर्षी दुसरा क्रमांक पटकावला तसेच जलयुक्त शिवार योजनाही योग्य पद्धतीने राबवल्याने अनेक जलसंधारणाची कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली आहेत.वाडीसाठी वरदान असणारा एलदरा तलाव यापूर्वी गळतीमुळे ओव्हर फ्लो न होताच रिकामा होत असे त्यामुळे त्याची दुरुस्ती व्हावी, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी या योजनांच्या माध्यमातून पूर्ण झाली व नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने तलाव पूर्ण भरून सांडव्यातून पाणी पडल्याने ग्रामस्थांनी आनंदीत होऊन जलपुजन केले.
यावेळी  ग्रामपंचायत सदस्य शहाजी कळमकर, रामदास कळमकर, भाऊसाहेब कळमकर मेजर, देविदास कळमकर, बाळासाहेब औटी, आप्पा औटी, रमेश औटी, संजय कळमकर, नानाभाऊ कळमकर, गणेश कळमकर, किरण कळमकर, महेंद्र कळमकर, शिवाजी कळमकर, प्रशांत कळमकर, बाळू कळमकर, संयोग कळमकर, संकेत औटी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment