मनसेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब माळी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 26, 2020

मनसेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब माळी

 मनसेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब माळी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर येथे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्ह्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री सचिन डफळ साहेब, जिल्हा सचिव श्री नितीन भुतारे साहेब होते. मागील काही दिवसांपूर्वी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते बाळासाहेब माळी यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते बाळा नांदगांवकर, राज्य सहकार सेनेचे सरचिटणीस अनिल चितळे यांच्या सुचनेनुसार माळी यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
    तसेच  मारुती रोहोकले यांनी पक्षासाठी केलेले योगदान पाहून यांना  मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. निवडीचे पत्र  जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ , जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले मारुती रोहोकले, तसेच नवीन तालुकाध्यक्ष झालेले बाळासाहेब माळी, पारनेर शहर अध्यक्ष वसिम राजे, पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश दादा पवार, तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के साहेब, प्रकाश राजदेव, महेंद्र घाडगे, मनविसे तालुका सचिव जालिंदर बांडे तसेच पारनेर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment