काझेवाडी तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती करावी : सय्यद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 26, 2020

काझेवाडी तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती करावी : सय्यद

 काझेवाडी तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती करावी : सय्यद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडून काझेवाडी तलावाच्या सांडव्याचे काम दुर्लक्षित राहिले आहे. तलाव भरतो मात्र अनेक ठिकाणी फुटलेल्या सांडव्यातून पाणी वाया जाते हा सांडवा दूरूस्ती करावा अशी मागणी व्यापारी तथा शेतकरी रऊफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकर्यांच्या वतीने आमदार रोहित पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
भरलेल्या तलावाची आमदार रोहित पवार यांनी पहाणी केली व तलावाच्या इतिहासात प्रथमच जलपुजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यापारी रऊफ सय्यद  आकाश लोखंडे, वसीम सय्यद, अमोल गिरमे, काका राळेभात, आक्रम सय्यद, तय्यब सय्यद  नितीन जगताप, शाहीद शेख, प्रकाश काळे, सुरेश शिंदे सह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 शहरासह पंचक्रोशीतील रत्नापूर, जमादारवाडी, बटेवाडी, चुंबळी आदी गावांना काझेवाडी तलावाच्या पाण्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी उपयोग होतो. येत्या काळात तलावाचा सांडवा व इतर दूरूस्ती करू असे आमदार पवारांनी सांगितले.

No comments:

Post a Comment