जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 4, 2020

जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहीर

 जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहीर


नेवासा
: तालुक्यातील भानसहिवरे येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानचे विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अकरा व्यक्तींना देण्यात येणारे समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे यांनी दिली. जलमित्र सुखदेव फुलारी, नेवासा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, पत्रकार चंद्रकांत दरंदले, डॉ.अविनाश काळे, सौ.आशा गर्जे आदींचा यात समावेश आहे.

अधिक माहिती देतांना श्री.मोहिटे म्हणाले,जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षीपासुन विविध क्षेत्रात दिशादर्शक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्व.सौ.द्वारकाबाई मारूतराव मोहिटे पाटील समाजरत्न पुरस्कार सुरू केले आहेत.या वर्षी सन 2020 च्या समाजरत्न पुरस्कारासाठी पुरस्कार निवड समितीने विविध क्षेत्रातील अकरा पुरस्कारांची घोषणा केली आहे.

जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे जाहीर झालेले पुरस्कार असे…

जलमित्र सुखदेव फुलारी (पर्यावरण क्षेत्रातील समाजरत्न), नेवासा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दरंदले (पत्रकारीतेतील समाजरत्न), हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे व ज्ञानेश्वर मोटकर (आरोग्य सेवेतील समाजरत्न), आदर्शगाव वडूलेच्या माजी सरपंच सौ.आशा दिनकरराव गर्जे (कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील समाजरत्न), व्याख्याते व मुख्याध्यापक डॉ.रेवणनाथ पवार व मुख्याध्यापिका सौ.वृषाली घोडके (शिक्षण क्षेत्रातील समाजरत्न), कवी प्रा.राजेंद्र शेटे (साहित्यातील समाजरत्न), शरणापूर वृद्धाश्रमाचे संचालक रावसाहेब मगर (समाजसेवेतील समाजरत्न), नेवासा पंचायत समिती विस्तार अधिकारी संतोष कदम व भेंडा ग्रामविकास अधिकारी रेवननाथ भिसे (लोकसेवकांतील समाजरत्न)..

No comments:

Post a Comment