मारुती सुझुकी इको साजरी करत आहे भारतातील वारशाची दशकपूर्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 4, 2020

मारुती सुझुकी इको साजरी करत आहे भारतातील वारशाची दशकपूर्ती

 मारुती सुझुकी इको साजरी करत आहे भारतातील वारशाची दशकपूर्ती


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः मारुती सुझुकीची इको ही ख्यातनाम बहुपयोगी व्हॅन दैदिप्यमान 10 वर्षांचा कार्यकाळ साजरा करत आहे. दशकभराहून अधिक काळ यशस्वी वाटचाल केलेल्या या व्हॅनने एकूण विक्रीमध्ये 7 लाख गाड्यांचा टप्पा पार केला आहे. शिवाय, व्हॅन विभागात या गाडीने बाजारपेठेत 90 टक्के वाट्यासह वादातीत नेतृत्वस्थान मिळवले आहे. व्यावहारिक आणि प्रशस्त डिझाइन त्यासोबतच दमदार परफॉर्मन्स यामुळे मारुती सुझुकी इकोने गेल्या दशकभराहून अधिक काळ देशातील व्हॅन विभागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
कौटुंबिक प्रवासासाठी या गाडीने एक सुयोग्य पर्याय अशी ख्याती कमावली आहे. त्याचबरोबर एक विश्वासार्ह व्यावसायिक वाहन म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. या बहुपयोगी व्हॅनने अप्रतिम इंधन क्षमता, या वर्गातील सर्वोत्कृष्ट आरामदायीपणा, जागा, शक्ती आणि देखभालीचा कमी खर्च या वैशिष्ट्यांमुळे आपले दमदार स्थान निर्माण केले आहे. या वर्गातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा देणारी ही गाडी बहुविध उपयोगांसाठी तयार करण्यात आली आहे.
मारुती सुझुकीची इको या गाडीचे 50 टक्के ग्राहक तिचा व्यवसाय आणि वैयक्तिक वापर अशा दोन्ही प्रकारे करतात.  यात चालकासाठीची एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, रीव्हर्स पार्किंग सेन्सर्स, चालक आणि सहप्रवाशांच्या सीटबेल्टची आठवण करून देणारा अलार्म आणि वेगासाठीची अलर्ट सिस्टम अशा सुविधांचा समावेश आहे. मारुती सुझुकीच्या मिशन ग्रीन मिलियन या मोहिमेला पुढे नेण्यासाठी इको शाश्वत दळणवळण पर्याय पुरवण्यास बांधिल आहे. बीएस6  सीएनजी प्रकारातील गाडीमध्ये फॅक्टरी फिटेड एस-सीएनजी आहे. सर्व प्रकारच्या रस्त्यांवर कमाल परफॉर्मन्स आणि गाडी चालवण्याची अधिक सुविधा यामुळे मिळते.
या विभागात नेतृत्वस्थानी असण्यासोबतच इको आपल्या व्यवहार्य डिझाइन आणि दमदार वैशिष्ट्यांमुळे 2019 -20  मध्ये देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या पहिल्या 10 गाड्यांमध्ये आहे. आमच्या अंतर्गत ग्राहक माहितीनुसार 66 टक्के इको मालकांना वाटते की इतर व्हॅन्सच्या तुलनेत इको लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी आहे .गाडी चालवण्याचा विना कटकट अनुभव आणि देखभालीचा कमी खर्च यामुळे इकोने विशेषत: ग्रामीण भागात अतुलनीय अशी 68 टक्के वाढ अनुभवली आहे. ग्राहकांचा प्राधान्यक्रम असलेल्या इकोमध्ये पाच आसनी, सात आसनी, कार्गो आणि अ‍ॅम्ब्युलन्स अशा 12 प्रकारांची व्यापक श्रेणी उपलब्ध आहे.  
सतत उत्क्रांत होणार्‍या ग्राहकांच्या बहुविध गरजा पूर्ण करण्यासाठी खास रचना करण्यात आलेली इको सातत्याने सर्व गरजांसाठी एक पर्याय ठरली आहे. भारतातील सर्वाधिक विक्रीची बहुपयोगी व्हॅन म्हणून ओळखली जाणारी मारुती सुझुकी भागीदारी, विश्वासार्हता, कार्यक्षमता या भक्कम पायांवर रचण्यात आली आहे. या गाडीची किंमत 3,80,800  रुपयांपासून सुरू होते. म्हणूनच इको खर्‍या अर्थाने ’तुमच्या कुटुंबाची आणि व्यवसायाची अव्वल क्रमांकाची भागीदार’आहे.

No comments:

Post a Comment