आ. संग्राम जगताप यांचेकडे मांडली कैफियत! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

आ. संग्राम जगताप यांचेकडे मांडली कैफियत!

 आ. संग्राम जगताप यांचेकडे मांडली कैफियत!

भाजी विक्रेत्यांना मनपा कर्मचार्‍यांचा त्रास...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना व काँग्रेस पक्षातील नेत्यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून हा प्रश्न सुटल्याचे जाहीर केल्यानंतरही भाजीविक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने भाजी विक्रेत्यांनी आज आ. संग्राम जगताप यांची भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली.
आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः विक्रेत्यांशी चर्चा केली. बुधवारी सकाळी आपण स्वतः महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत रेषा आखून त्यांना व्यवस्थित जागेवर बसवण्याची व्यवस्था करू, अशी ग्वाही आमदार जगताप यांनी दिली. प्रोफेसर चौकातील एका दुकानदाराचे व विक्रेत्याचे भांडण झाले. याचे निमित्त करून महापालिकेने सर्वच विक्रेत्यांना हटवले. तब्बल चार दिवस विक्रीसाठी आणलेली भाजी विक्रेत्यांना तशीच परत न्यावी लागली. त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.. पण प्रश्न सुटला नाही. याबाबत आयुक्तांशी चर्चाही केली. त्यानंतर आता महापालिका तुम्हाला हटवणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. परंतु चौकात बसू नका,  नाही तर भाजीपाला जप्त करण्याबाबत विक्रेत्यांच्या मागे महापालिकेचा रोजच ससेमिरा सूरू आहे. त्यामुळे वैतागलेल्या विक्रेत्यांनी आज दुपारी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित खामकर यांच्या माध्यमातून  20 भाजी विक्रेत्यांनी आमदार जगताप यांची भेट घेतली.
येथील प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गत आठवड्यात महापालिकेने हटवले होते.  त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांसह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही विक्रेत्यांनी बसू न नये यासाठी महापालिकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या दरबारात आपली कैफीयत मांडत संरक्षण देण्याची मागणी केली. येथील प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गत आठवड्यात महापालिकेने हटवले होते. त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांसह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही विक्रेत्यांनी बसू न नये यासाठी महापालिकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या दरबारात आपली कैफीयत मांडत संरक्षण देण्याची मागणी केली.

No comments:

Post a Comment