बुथ रुग्णालयास 15000/- रू.चा धनादेश प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 12, 2020

बुथ रुग्णालयास 15000/- रू.चा धनादेश प्रदान

 बुथ रुग्णालयास 15000/- रू.चा धनादेश प्रदान

एल.अ‍ॅण्ड. टी इलेक्ट्रिक अ‍ॅण्ड ऑटोमेशन ई.एस.ई.एम.च्यावतीने


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर
ःकोविड-19 च्या विरोधात लढा देण्यासाठी शासनाच्या मदत करण्याच्या हेतूने एल.अ‍ॅण्ड. टी इलेक्ट्रिक अ‍ॅण्ड ऑटोमेशन (स्नायडर इलेक्ट्रिक) ई.एस.ई.एम. व्ही. चे प्लांट हेड श्री. दिलीप आढाव, उप महा व्यवस्थापक श्री. राजेंद्र नाईकवाडी, वरिष्ठ अभियंता श्री. सागर ससाने यांच्यातर्फ सामाजिक बांधिलकी म्हणून 15000/- रू. चा धनादेश अहमदनगर बुथ रुग्णालयास प्रदान करण्यात आला.बूथ रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. देवदान कळकुंबे व डॉ. अभिजीत केकान यांनी धनादेशाचा स्वीकार करून आभार व्यक्त केले.याप्रसंगी एल.अ‍ॅण्ड. टी इलेक्ट्रिकलअ‍ॅण्ड. ऑटोमेशन ई.एस.ई.एम. व्ही. चे प्लांट हेड श्री. दिलीप आढाव यांनी बुथ रुग्णालयाच्या प्रशासनाचे कोविड-19 विरोधी लढ्यातील योगदानाबद्दल कौतुक केले व तेथील सर्व अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले.

No comments:

Post a Comment