स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा?

 स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा?

सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबारकरांची मागणी..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 1 ऑक्टोंबरला होणार्‍या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीवरून सध्या मोठा घोडेबाजार सुरू आहे. हा घोडेबाजार थांबविण्यात यावा व नगरसेवक पद हे कायद्याने ठरविलेल्या नियमानुसारच देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भाबारकर यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केला आहे.भांबरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की त्यावेळी अर्ज दिलेल्या स्वीकृत नगरसेवकांनी सामाजिक संस्थेचे नावे दिली होती. त्यात अनेक त्रुटी निघाल्या होत्या. त्यामुळे त्या सर्वांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी अपात्र ठरवले होते.या राज्याच्या निवडणूक आयोगाने स्वीकृत नगरसेवकपदासाठी काही नियमावली ठरवून दिलेली आहे. त्या नियमावलीनुसार संभाव्य स्वीकृत नगरसेवक हा मान्यता प्राप्त आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असावा.त्याला किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. शिक्षण क्षेत्रातील निवृत्त प्राध्यापक , मुख्याध्यापक या पदांचा किमान पाच वर्षांचा अनुभव, सनदी लेखापाल किंवा परिव्यय लेखापाल म्हणून पाच वर्षांचा अनुभव, पाच वर्षांचा इंजिनिअर या पदाचा अनुभव,त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची कायदयाची पदवी, विधी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, वय तसेच या सर्वांचा अनुभव, महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या समाज कल्याण कार्यालया मध्ये नोंदणीकृत संघटनेचा पदाधिकारी म्हणून पाच वर्षाचा अनुभव असलेली व्यक्तीच स्वीकृत नगरसेवक पदासाठी पात्र ठरते, असे नियमात लिहिलेले आहे.हे सर्व नियम धाव्यावर बसवून राजकीय पक्ष त्यांच्याजवळील समर्थक कार्यकर्त्यांनाच स्वीकृत नगरसेवक करतात. स्वीकृत नगरसेवक पद हे निवडणूक आयोगाने ठरवलेल्या नियमात दिले नाहीतर आम्हाला आपल्या विरुद्ध न्यायालयात कायदेशीर दाद मागवावी लागेल.अहमदनगर शहरामध्ये स्वीकृत नगरसेवकपदी पात्र असलेले भरपूर लोक आपल्या आजुबाजुला आढळून येतील. त्यातील लोकांना वरील नियमानुसार त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात यावे आणि या निवड प्रक्रियेमध्ये होणारा मोठा ‘घोडेबाजार’ थांबविण्यात यावा.असेही ते निवेदनात म्हटले आहे.
No comments:

Post a Comment