पोखरन्याई आई देवीच्या सभामंडपाचे नगरसेविका सोबले यांच्या हस्ते लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 7, 2020

पोखरन्याई आई देवीच्या सभामंडपाचे नगरसेविका सोबले यांच्या हस्ते लोकार्पण

 पोखरन्याई आई देवीच्या सभामंडपाचे नगरसेविका सोबले यांच्या हस्ते लोकार्पण


विजेता सोबले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत म्हटले की विरोधकांचे कामच टीका करणे आहे त्यांनी आपल्या प्रभागांमध्ये काय दिवा लावला आहे हे जनतेसमोर दाखवा मग दुसर्‍या वर टीका करावी प्रभागांमध्ये  आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कामे केली आहे त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केला व ते काम करून घेतले यांच्यामागे जनमत नाही त्यांनी टीका करू नये

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर शहरातील नगरपंचायत येथील वार्ड क्रमांक चार मधील पोखरन्याआई  सभामंडप भूमिपूजन श्री .दत्तामहाराज सोबले यांच्या हस्ते करण्यात आले. सोबलेवाडी व बुगेवाडी या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार या मंदिरातील सभामंडप व खोल्या साठी नगरसेविका विजेता विलास सोबले यांच्या प्रयत्नाने पाच लाख मंजूर करण्यात आला नगरसेविका सोबले यांनी यापूर्वी जवळपास दोन कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे उद्घाटन या वेळी करण्यात आले यावेळी बोलताना नगरसेविका विजेता सोबले यांनी सांगितले की या पुढील काळामध्ये आपण परिसरातील विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत प्रभागांमध्ये सर्वात जास्त विकास काम करण्यात आली आहे यापुढेही अशाच प्रकारची विकासकामे सुरू राहतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्री. सावजी सोबले(सुभेदार) यांनी व श्री . बापु सोबल े(मेजर) यांनी सोबलेवाडी व बुगेवाडी च्या विकासा बद्दल सौ.विजेता सोबले नगरसेविका यांचे कौतुक केले. यावेळी रघुनाथ सोबले सुभाष शिंन्दे, रामदास थोरात, सतिष कावरे, बाळु सोबले, श्रीधर सोबले, बाबाजी सोबले,बबन बुगे, संतोष दिघे, बाळु म्हस्के, विठ्ठलशेट कावरे, विश्वास सोबले,प्रविन सोबले संजय सोबले बाळासाहेब शेरकर, यशवंत सोबले, आणी दत्ताशेट अंबुले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment