अखेर उगवता सूर्य मावळला... शरदराव तोडमल (भाऊ) यांचे दुःखद निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

अखेर उगवता सूर्य मावळला... शरदराव तोडमल (भाऊ) यांचे दुःखद निधन

 अखेर उगवता सूर्य मावळला...

शरदराव तोडमल (भाऊ) यांचे दुःखद निधननगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः वाकोडी परिसर ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरदराव मुरलीधर तोडमल (भाऊ)  यांचे आज सकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले असुन त्यांचे मागे पत्नी, भाऊ, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, अहमदनगर जिल्हा दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन, सतत पंचवीस वर्षे वाकोडी गावचे सरपंच, अहमदनगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे खंदे व विश्वासू समर्थक म्हणून ते जिल्ह्याला परिचित आहेत.

शरदा सारखा नितळ आणि चंद्रासारखा शांत असा उगवता सूर्य आज अखेर मावळला. त्यांचे वक्तृत्व निशब्द करणारे होते. शेती व्यवसाय बरोबरच व्यापार-उद्योगात शरदराव तोडमल यांचे फार मोठे प्रस्थ होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राच्या जोडीला धार्मिक क्षेत्रामध्येही शरदराव अग्रेसर असायचे आजपर्यंत राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज यांचे ते व्याही होते. सर्वगुण संपन्न (भाऊ) आपल्या मोठ्या परिवारास अंधारात ठेऊन हा उगवता सूर्य आज मावळला... अशा या मावळत्या धकधकत्या सुर्यास भावपूर्ण श्रद्धांजली! 

(भाऊंच्या) जाण्याने वाकोडी गावावर शोककळा पसरली असुन पंचक्रोशीतील गावामध्येही हळहळ व्यक्त होत आहे.  

No comments:

Post a Comment