भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव झोडगे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव झोडगे यांची निवड


भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव झोडगे यांची निवड

स्व.गोपाळराव झोडगे यांचे कार्य पुढे सुरु ठेवणार - नूतन चेअरमन अनिलराव झोडगे


     नगर - भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव माधवराव झोडगे यांची निवड करण्यात आले. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. याप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, संचालक नाथाजी राऊत, कैलास खरपुडे, रामेश्वर परभाने, विष्णू फुलसौंदर, नामदेव लंगोटे, विजय भंडारी, संदेश झोडगे, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, राजेंद्र पतके आदि उपस्थित होते. चेअरमनपदासाठी अनिल झोडगे यांच्या नावाची सूचना कांताबाई फुलसौंदर यांनी केले, त्यास तिलोत्तमा करांडे यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते अनिल झोडगे यांची चेअरमनपदी निवड जाहीर करण्यात आली. भिंगार बँकेचे चेअरमन स्व.गोपाळराव झोडगे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.याप्रसंगी अनिलराव झोडगे म्हणाले, स्व.गोपाळराव झोडगे यांचे भिंगार अर्बन बँकेच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. त्यांनी बँकेचा केलेला विस्तार आणि आधुनिकीकरणामुळे बँकेचा राष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त झाला आहे. त्यांनी बँकेसाठी केलेले दिशादर्शक कार्य आपण यापुढे असेच सुरु ठेवू. सर्व संचालकांनी माझ्यावर विश्वास टाकून चेअरमनपदावर निवड केली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. यापुढील काळात सर्वांनाबरोबरच बँकेच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी प्रयत्न करु, असे सांगितले.याप्रसंगी  जिल्हा उपनिबंधक कार्यातील अधिकारी,स्वीकृत संचालक आर.डी.मंत्री, राजेंद्र बोरा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत खोपटीकर आदि उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या निवडीनंतर चेअरमन अनिल झोडगे यांचा संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

No comments:

Post a Comment