के.के.रेंज संदर्भात शरद पवार व आमदार निलेश लंके यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

के.के.रेंज संदर्भात शरद पवार व आमदार निलेश लंके यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा !


के.के.रेंज संदर्भात शरद पवार व आमदार निलेश लंके यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा !

 के.के.रेंज बाधित जनतेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार - शरद पवार


पारनेर प्रतिनिधी : संतोष सोबले

         अहमदनगर जिल्ह्यातील 23 गावावरती आलेल्या के.के.रेंजच्या संकटा बाबत शुक्रवारी पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.निलेशजी लंके यांनी देशाचे नेते मा.संरक्षणमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन या 23 गावातील के.के.रेंजच्या प्रश्ना बाबत सर्व भौगोलिक स्थितीचा आढावा निवेदनाद्वारे शरद पवार ह्यांना सुपूर्त करण्यात आला.त्यात के.के.रेंज धोरणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 23 गावांचे जनजीवन विस्कळित झाले आहे या गावामध्ये राहणारे सर्वाधिक लोक आदिवासी व मागासवर्गीय असून शेतकरी व कष्टकरी आहेत या गावांमधील लोकांनी वित्तीय संस्था सहकारी व सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कर्ज देण्यास नकार देत आहे.पारनेर तालुक्यातील तास या गावातील आदिवासी लोकांना शासनाच्या नियमा प्रमाणे वन जमीन वाटप केले जात आहे के.के.रेंज विस्तारीकरणाचे कारण सांगत गावातील जमीन येणे (नॉन एग्रीकल्चर) होण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.के.के. रेंज विस्तार धोरणामुळे या भागात राहणार्‍या लोकांच्या दैनंदिन जडणघडणीवर परिणाम होत आहे .या भागातील के.के. रेंज विस्तारीकरण मध्ये मुळा धरण प्रकल्प येत असून भविष्यात लष्कराच्या सरावामुळे या धरण क्षेत्राला धोका निर्माण होऊ शकतो ? हे धरण जर फुटले तर किमान दोन-तीन जिल्ह्याची भौगोलिक स्थिती नेस्तानाभूत होऊ शकते ? या धरणावर शहराचे पाणीपुरवठा अवलंबून आहे.मुळा धरण व काळू धरण याचा पाणीसाठा मुळे हजारो आदिवासी मच्छिमारी व्यवसाय करत आहेत मुळा धरण स्टोरेज कॅपॅसिटी 26000 चउऋढ इतकी असून यामुळे या धरणासाठी 6918 एकर जमीन उपलब्ध आहे.मुळा धरणाच्या पाणी साठ्यामुळे 86000  हेक्टर जमीन शेतीसाठी ओलिताखाली  येत आहे.या विभागात मुळा धरणामध्ये शेतकर्‍यांची हजारो एकर क्षेत्र पाण्यामध्ये बुडले आहे. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या शेतकर्‍यांच्या जमिनीही गेले आहेत व विस्थापित लोकांची औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जमीन देण्यात आली आहे.तेथेही जायकवाडी धरण बनवले आहे.व तेथूनही त्यांना विस्थापित केले आहे.या विभागात मुळा धरण पाणीसाठ्या साठी आजवर करोडो रुपये खर्च करत शेतकर्‍यांनी कर्ज काढून पाइपलाइन करून शेतापर्यंत पोहोचवला आहे.ही यादी सूचना पारित करण्याच्या वेळेस 1938 चा आधार घेत वास्तविक 1938 मध्ये परकीय सत्ता होती तेव्हा लोकसंख्या अतिशय कमी होती.आत्ता प्राप्त परिस्थितीचा विचार करत लोकसंख्या वाढीमुळे शेत जमीन विकसित करण्यात आली आहे.प्राप्त परिस्थितीचा विचार करता असे निदर्शनास आले आहे की, जनतेच्या मनामध्ये के.के. रेंज विस्तार करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.संबंधित नागरिकांनी वेळो वेळी अनेक प्रकाराने तिर्व स्वरूपात आंदोलनाची तयारीही केलेली आहे.तेव्हा या संदर्भात आपण विस्तार थांबवण्यासाठी संबंधित खात्याच्या संदर्भात संबंधित विभागा बरोबर चर्चा करत 23 गावांच्या लोकांची होणारी ससेहोलपट थांबविण्या साठी सहकार्य करावे व या विभागातील शेत जमिनीचे मूल्यांकन झाल्याचे या प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात आले आहे.असेही या निवेदनात म्हटले आहे.लष्कराच्या गाड्या व अधिकारी गोवो गावात, ग्रामपंचायत मध्ये येत जात आहेत.त्यामुळे जनतेमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घटनेवरून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लष्कराचे सर्वेक्षण गावोगावी चालू असून आपण त्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या सोबत बोलून सदर सर्वेक्षणास स्थगिती देण्यात यावी.व कायम स्वरूपी के.के. रेंज चा विषय मार्गी लावन्यासाठी आपण सदर प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे असी विनंती आ.लंके यांनी शरद पवार यांना केली. यावेळेस शरद पवार यांच्या सोबत सकारात्मक चर्चा होऊन पवार साहेबानी शब्द दिला की आपण लवकरच संरक्षण मंत्री मा.राजनाथसिंह साहेब यांची भेट घेऊन संबंधित के.के.रेंज बाबत मार्ग काढू जनतेने घाबरून जाऊ नये या लढ्यात मी तुमच्या सोबत असणार आहे.असा शब्द यावेळी शरद पवार यांनी दिला.यावेळी उपस्थित वनकुटे गावचे सरपंच अँड.राहुल झावरे,जि.प.सदस्य श्री.धनराज गाडे,गणेश हाके,सचीन पठारे,धोंडीभाऊ टकले यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment