निघोजमधील कुकडी नदी पात्रात लोखंडी पेटीत सापडला मृतदेह! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

निघोजमधील कुकडी नदी पात्रात लोखंडी पेटीत सापडला मृतदेह!

 निघोजमधील कुकडी नदी पात्रात लोखंडी पेटीत सापडला मृतदेह!

जगप्रसिद्ध कुंड रांजणखळगे हा नगर-पुणे दोन जिल्हाहद्दी वर असुन लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले जागृत मळगंगा देवीचे मंदिर परीसर आहे. कोरोना सारख्या महामारी मुळे भाविक व पर्यटक येत नसल्यांचा फायदा घेवूनच हे कृत्य केले असल्यांची शक्यता वर्तवली जात आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील निघोज (ता.पारनेर) येथील कुकडी नदीच्या कुंडामध्ये अंदाजे वय 35ते 40वर्ष पुरुष जातीचे प्रेत पाण्यामध्ये वाहून आले होते याबाबतची माहिती पारनेर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी व सहकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली.
निघोज येथील कुकडी नदीच्या कुंडात एका पेटीमध्ये हा मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली तर हे प्रेत पुरुष जातीचे असल्याची माहिती समोर आली तसेच मयत पुरुषाचे 35 ते 40 वर्षे वय असण्याची शक्यता आहे कुकडी नदीचा पाण्याच्या प्रवाहामध्ये हे प्रेत वाहून आले असण्याची शक्यता आहे. या व्यक्तीचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, याबाबत पोलिसांचा शोधाशोध सुरू आहे प्रथमता अकस्मात मृत्यूची नोंद केली जाणार आहे, मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पोलीस तपासाची दिशा ठरवली जाणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे. मृतदेह लोखंडी पेटीमध्ये असल्यामुळे काहीतरी घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार उपनिरीक्षक विजयकुमार बोमे यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.


No comments:

Post a Comment