ट्रकचालकाला लुटणारे 4 सराईत आरोपी गजाआड! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

ट्रकचालकाला लुटणारे 4 सराईत आरोपी गजाआड!

 ट्रकचालकाला लुटणारे 4 सराईत आरोपी गजाआड!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून चोरी करणारे 4 सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह जेरबंद केले आहेत. दि.1 ऑगस्ट रोजी फिर्यादी भुजंग नामदेव केदार हे ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून केबिनमध्ये झोपलेला असताना चोरट्यांनी त्याच्या ताब्यातील रोख रक्कम, सोन्याचा ओम व मोबाईल असा 29 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास केला.
या तपासातून अमोल नारायण होडगर (वय 21, रा.पिंपरी अवघड, ता.राहुरी), पांडुरंग भास्कर कोकरे (वय 25, रा.कवडगाव, ता.गेवराई, जि.बीड), अजित सुभाष सूळ (वय 20, रा.मिडसांगवी, ता.पाथर्डी), दीपक मधुकर तळेकर (वय 25, रा.मांदळमोही, ता.गेवराई, जि.बीड) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी अमोल नारायण होडगर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राहुरी, सोनई, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे स्थानिक गुन्हे शाखेचे शेवगाव विभाग पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आली. या कारवाईत पोहेकॉ मनोज गोसावी, पोना संदीप कचरु पवार, राम माळी, भागिनाथ पंचमुख, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, विनोद मासाळकर आदींनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment