घरीच गणेशोत्सव साजरा करुन उत्साह कायम ठेवला ः सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

घरीच गणेशोत्सव साजरा करुन उत्साह कायम ठेवला ः सातपुते

 घरीच गणेशोत्सव साजरा करुन उत्साह कायम ठेवला ः सातपुते

नागापुरे यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर
ः शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार गणेशोत्सव सार्वजनिक साजरा न करता घरगुती पद्धतीने साजरा होत आहे. यामुळे अनेक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे.  अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी आता घरी बसविलेल्या श्री गणेशाची पूजा करुन आकर्षक अशी सजावट केली आहे. या गणेशाची दैनंदिन आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे.
बोल्हेगांव येथील दत्तात्रय नागापुरे यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती करताना शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते. समवेत उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक अमोल येवले, अंबादास शिंदे, अक्षय नागापुरे, अभिषेक भोसले आदि उपस्थित होते.
यावेळी दिलीप सातपुते यांनी यंदाचा गणेशोत्सव हा सार्वजनिक स्वरुपात झाला नसला तरी पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा करु. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व प्रशासनास सहकार्य करावे. लवकरच हे संकट दूर होईल, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. कार्यकर्त्यांनी घरीच गणेशोत्सव साजरा करुन आपला उत्साह कायम ठेवला असल्याचे सांगितले.


No comments:

Post a Comment