सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी !

 भारतीय जनता पक्षाच्यावतीने...

उद्या घंटा नाद आंदोलन!

सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी !

महाराष्ट्र राज्यतील संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थाने, तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यवसायिक राज्यात धार्मिक स्थळे,मंदिरे सुरू करण्यासाठी शनिवार दि 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा राज्यात सर्वत्र देवस्थाने, मंदिरे,धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलने करणार आहेत. दार उघड उद्धवा दार उघड, दारू नको. भक्तीचे दार उघड, मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभाराच धुंद, भक्तांना जेल गुन्हेगारांना बेल असे या घंटानाद आंदोलनाचे स्वरूप असणार आहे. तरी भा.ज.पा.च्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टनसिंग, फेस मास्कचा वापर करून आपापल्या कार्यक्षेत्रात या आंदोलनात सहभागी व्हावयाचे आहे.व आपण सहभागी झाल्याचे वृत्त ,छायाचित्र लागलीच 8657718220 या व्हाट्स अप वर तसेच लक्षिारहरसारळश्र.लेा यावर अहमदनगर शहरजिल्हा या हेड खाली पाठवावे ही विनंती भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष भैया गांधी यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील शिर्डीचे साईबाबा मंदिर, शिंगणापूर, देवगड येथील दत्त मंदिर, अशी अनेक मंदिरे पाच महिन्यापासून बंद आहेत, मढी येथील कानिफनाथ मंदिर, वृद्धेश्वर मंदिर, मोहटादेवी 5 महिन्यांपासून बंद आहेत.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतीय जनता पक्षाकडुन राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी केली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गेली 5 महिन्यांपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद असल्याने कोट्यवधी भाविक अस्वस्थ असल्याने नियम व अटी घालून सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं 1 सप्टेंबर पासून उघडण्यास परवानगी देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या.29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाभरात आंदोलन करण्यात येणार असून सर्व धर्मीय नागरिकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या घराजवळ असलेल्या प्रार्थनास्थळाजवळ घंटानाद किंवा इतर प्रतिकात्मक कृती करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन भारतीय जनतापक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकातून मधून म्हंटल आहे कि, उपासनेतून माणसाला मन:शांती लाभत असते. आत्मिक व मानसिक शक्ती मिळते. त्यामुळे भाविक प्रार्थनास्थळात जाऊन पूजाअर्चा करीत असतात. सध्याच्या वातावरणात तर मानसिक शांती मिळणे अत्यावश्यक आहे.राज्यात आता अनलॉक-3 नंतर सरकारने अटी व नियमांसह अनेक उद्योगधंदे, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याची परवानगी देऊन 80 ते 90 % व्यवहार चालू करण्यास परवानगी दिली आहे. दारूच्या दुकानांना देखील परवानगी आहे मग धार्मिक स्थळं देखील लाखोंच्या उपजीविकेचे साधन असताना फक्त त्यांनाच बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय आहे? भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला लॉकडाऊन लागू करताना देशातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र अनलॉक-1 च्या दुसर्‍या टप्प्यात केंद्र सरकारने 8 जून पासून अटी शर्तींसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याची परवानगी दिली होती. याला अनुसरून अनेक राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यात आली आहेत मात्र महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्याप बंद आहेत.
राज्यातील इतर प्रार्थना स्थळांसोबत तुळजापूर स्थित महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर देखील गेली 5 महिन्यांपासून बंद असल्याने याठिकाणी पूजेला लागणारे साहित्य व फुलहार विक्री करून ज्यांची गुजराण चालते अशा हजारो नागरिकांच्या हातातोंडाशी येणारा घास बंद झाला आहे. भाविकांचा ओघ बंद असल्याने हाताला इतर कुठलेही काम नाही. त्यामुळे पैशांची येणारी आवक पूर्णपणे मंदावली आहे. दैनंदिन खर्चात कुठलीही बचत करता येत नसल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे व राज्यभरातील इतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पण अशीच परिस्थिती आहे.

No comments:

Post a Comment