स्व.राठोड यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून दिला ः जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 12, 2020

स्व.राठोड यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून दिला ः जाधव

 स्व.राठोड यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून दिला ः जाधव

नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर
ः नगर शहरात शिवसेना आणि हिंदूत्ववाद रुजविण्याचे मोठे कार्य स्व.अनिल राठोड यांनी केले. नगर शहरातील जनतेने त्यांना सलग 25 वर्षे आमदार म्हणून निवडून दिले हीच त्यांच्या कार्याची पावती म्हणावी लागेल. त्यांनी सर्वसामान्य, गोर-गरीबांच्या प्रश्नांसाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून दिला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचे स्थान देऊन त्यांना विविध पदे मिळवून दिली. त्यांचा हा झंझावत जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर होता. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना यांच्यावर त्यांनी नितांत निष्ठा व प्रेम केले. सर्वसामान्यांचा ‘भैय्या’ ही ओळख त्यांच्या कार्याची ओळख होती. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी केले.
नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने स्व.अनिल राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, मंडळाचे अध्यक्ष सुरज जाधव, उपाध्यक्ष कुणाल गवळी, आदेश जाधव, रवि जाधव, गणेश जाधव, विजय जाधव, सागर शिंदे, वैभव कदम, विकी हिरणवाळे, पंकज अडगळे आदि उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरज जाधव म्हणाले, नंदनवन मित्र मंडळाच्या विविध कार्यात स्व.अनिल राठोड यांचे नेहमीच मार्गदर्शन असे. त्यांच्या कार्यकर्तुत्वाने नगर शहरात विविध योजना मार्गी लागल्या. नगर शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या अकाली निधानाने मंडळाच्यावतीने यंदाच्यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यंदा सामाजिक उपक्रमांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी अमोल घोडके, विशाल गायकवाड, सचिन झेंडे, सुनिल डमाळे, अजय जाधव, अमोल लोखंडे आदि उपस्थित होते.


No comments:

Post a Comment