भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनिलभैय्यांना अपेक्षित असलेलेच जनतेचे काम करतील ः गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 12, 2020

भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनिलभैय्यांना अपेक्षित असलेलेच जनतेचे काम करतील ः गंधे

 भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनिलभैय्यांना अपेक्षित असलेलेच जनतेचे काम करतील ः गंधे

शहर भाजपच्या वतीने शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड यांना श्रद्धांजली


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहराचे लाडके आमदार म्हणून लौकिक असलेले अनिलभैय्या राठोड हे जनसामान्यांचे नेते होते. अल्पसंख्याक समाजाचे असतानांही त्यांनी शहराचे नेतृत्व केले. भाजपाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
भाजपातील अनेक नेत्यांशी त्यांचे तात्विक वाद होत असत, मात्र प्रत्तेक निवडणुकीत भाजपच्या सर्व नेत्यांनी अनिलभैय्यांचेच काम केले. त्यांच्या विजयात भाजपाचा मोठा वाटा होता, हे सर्वमान्य आहे. आज अनिलभैय्या आपल्यात नसले तरी भविष्यात भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अनिलभैय्यांना अपेक्षित असलेलेच जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष, नगरसेवक महेंद्र गंधे यांनी केले. शहर भाजपच्या वतीने शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादा चौधरी विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे महापौर बाबासाहेब वाकळे, जेष्ठ नेते वसंत लोढा, सुनील रामदासी, सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, नरेंद्र कुलकर्णी, नगरसेवक रवींद्र बारस्कर, तुषार पोटे, महेश तवले, सचिन पारखी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, अनिलभैय्यांकडे कोणताही साखर कारखाना नाही, शैक्षनिक संस्था नव्हती तरी ते लोकनेते होते. सर्वसामान्यांसाठी ते सतत धाऊन जात होते. मोबाईल आमदार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पासून शिकवण घेत पुढे काम करू. वसंत लोढा म्हणाले, 40 वर्ष अनिलभैय्यांनी आपला कामाचा ठसा उमटवला.
कायम युती धर्म पाळणारे. भाजपाचा म्हणून माझे अनेकदा त्यांच्याशी मतभेद झाले. तसेच दिलीप गांधी, सुनील रामदासी, अभय आगरकर, प्रभाकर दसरे यांच्याही काही तात्विक बाबींवर मतभेद झाले. तरीही युती धर्म पाळत त्यांच्या विजयासाठी भाजपाने कायम संघर्ष करत खांद्याला खांदा लाऊन लढलो. त्यामुळे पाच निवडणुकीत त्यांना विजय मिळाला.
आता त्यांच्या पाश्च्यात त्यांचा वारसा पुढे चालवण्याचे काम भाजप करेल. सुनील रामदासी, अनिलभैय्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. महानगरपालिकेत अनेक वर्ष भाजप सेना युतीच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले. सचिन पारखी यांनी अयोध्या राममंदिराचा भूमिपूजन सोहळा शहरात मोठ्या जल्लोष्यात साजरा करण्याचे अनिलभैयांचे स्वप्न अपूर्णच राहिले असे सांगितले.
नरेंद्र कुलकर्णी यांनीही अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनिल गट्टाणी, वसंत राठोड, अमित गटणे, मनोज ताठे, संतोष गांधी, भरत सुरतवाला, बाबा खान आदि उपस्थित होते.

                                                                                            

No comments:

Post a Comment