कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने आ.मोनिका राजळे होम क्वॉरंटाईन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 20, 2020

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने आ.मोनिका राजळे होम क्वॉरंटाईन

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात
आल्याने आ.मोनिका राजळे होम क्वॉरंटाईन



शेवगाव ः पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे कोरोना पॉझिटिव्हच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने काल दिनांक 18 जुलैपासून  होम कॉरनरटाईन  होत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी शेवगावच्या  आमदार मोनिका राजळे या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने  काल शनिवार दि 18 जुलै रोजी त्यांची जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर येथे  घशाचा स्रावाचा नमुना  घेऊन कोरोना टेस्ट घेण्यात आली. तेव्हापासून त्या  होम कॉरनरटाईन झाल्या  आहेत. दरम्यान रात्री उशिरा साडेनऊ वाजता त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. परंतु त्यांना 14 दिवस  होम कॉरनरटाईन राहण्या बाबत  सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार मोनिका राजळे  स्वतःच्या घरीच कॉरनरटाईन झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की पाथर्डी व शेवगाव शहर आणि  ग्रामीण भागात कोरोना  रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु मतदार संघातील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनती आहे की, घाबरू नका, स्वतःची  काळजी घ्या असे आवाहन करण्या बरोबरच होम कॉरनरटाईन असल्या तरी त्या दूरध्वनीद्वारे सतत जिल्हाधिकारी अहमदनगर  शेवगाव, पाथर्डी तहसीलदार दोन्ही तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या संपर्कात असून, त्यांनी प्रशासनास  पाथर्डी-शेवगाव साठी तातडीच्या उपाययोजना बरोबरच, रापिड   स्क्रीनिंग, टेस्टिंग व उपचार वाढवण्या बाबतच्या सूचना दिल्या आहेत व  त्या  बाबतचा आढावाही घेत आहेत. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी घाबरू नये, काळजी घेऊन सुरक्षित राहण्याचे  आवाहन त्यांनी केले  असून नागरिकांना काही अडचणी असल्यास नागरिकांनी  पाथर्डी आमदार कार्यालय व  शेवगाव आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच  गरज वाटल्यास आमदार यांच्या फोनवर संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment