सा.बां विभागाचे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 20, 2020

सा.बां विभागाचे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी

सा.बां विभागाचे शाखाअभियंता विक्रम
गर्ज यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी

विक्रम गर्ज यांची बदली का होत नाही; सार्वजनिक बांधकाम विभागाचे मौन ?

दादासाहेब खेडकर
 
खरवंडी कासार ःपाथर्डी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांची नेमनुक झाल्यापासून आजतागायत पाथर्डी उपविभागीय कार्यालयात गत नऊ वर्षापासून कार्यरत आहेत शासन निर्णयानुसार सरकारी अधिकार्याची तीन वर्षात बदली होत असते माञ पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे अशी ज्यामुळे गत नऊ वर्षापासून ते पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय कार्यालयात आजही सेवेत आहेत.
आजही हा प्रश्न अनुत्तरीत आहे गत नऊ वर्षात पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे शाखाअभियंताविक्रम गर्ज यांनी अनेक भ्रष्टाचाराची कामे ठेकेदारांशी हात मिळवणी करुन केले आहेत पाथर्डी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणारे तालुक्यातील रस्त्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे करुन लाखो रुपयांची बील ठेकेदारास मिळवुन दिली आहेत पाथर्डी तालुक्यातील रहिवासी शाखाअभियंता विक्रम गर्ज यांचे राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी हितसंबंध असल्याने बदली केली जात नसल्याचे बोलले जात आहे.
शाखाअभियंता विक्रम गर्ज यांनी कमवलेल्या अनैसर्गीक संपत्तीची आयकर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी व सरकारची फसवणूक करुन करोडो रुपयांची संपत्ती जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा व शाखाअभियंता विक्रम गर्ज यांची जिल्हाबाहेर तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी माहीती अधिकार महासंघ पाथर्डी तालुकाध्यक्ष शैलेंद्र जायभाये यांनी  लेखी निवेदनाद्वारे केली आली आहे.

No comments:

Post a Comment