लॉकडाऊनच्या काळात 85000 मास्क केले तयार; सुनंदा पवार यांनी दिला शेकडो महिलांच्या हाताला रोजगार! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 13, 2020

लॉकडाऊनच्या काळात 85000 मास्क केले तयार; सुनंदा पवार यांनी दिला शेकडो महिलांच्या हाताला रोजगार!

लॉकडाऊनच्या काळात 85000 मास्क केले तयार; सुनंदा पवार यांनी दिला शेकडो महिलांच्या हाताला रोजगार!
पुणे/बारामती ः ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मगरपट्टा व नांदेड सिटी ग्रूप यांच्या वतीने सामाजिक भावनेतून नेहमीच ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला जात असतो. आजही मास्क तयार करण्याच्या कामाला महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष व मगरपट्टा सिटीचे सर्वेसर्वा श्री.सतीश मगर यांचे  विशेष सहकार्य होत आहे.
ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार या ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी संस्थेच्या वतीने नेहमीच काम करत असतात.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 15 वर्षांपूर्वी शारदा महिला संघामार्फत ग्रामीण भागात महिला बचत गटांची चळवळ सुरू करण्यात आली. हजारो महिला या चळवळीत एकत्र आल्या ,प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने उत्पादने बनवू आणि विकू लागल्या. मात्र ग्रामीण भागातील विक्रीच्या अडचणी लक्षात घेता सुनंदा पवार यांच्या दुरदृष्टीतून  महिलांच्या उत्पादनांना कायमची आणि हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून भीमथडी जत्रा, गाव तिथे महिला उद्योग, ऑनलाइन  भिमथडी असे आर्थिक आणि महिला सबलीकरणाचे उपक्रम संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आले,ते यशस्वीही झाले.हजारो महिलांना त्याचा फायदा झाला.
मागील 4 महिन्यांच्या काळात जगभरात कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला,व्यवसाय कमी झाला, या अडचणीच्या काळातही संस्था महिलांच्या हाताला काम व कामाला योग्य दाम देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. कोरोना या महामारीत अनेक ग्रामीण महिलांचा रोजगार कमी झाल्याने त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असताना  सामाजिक भान आणि जाण ठेवून सुनंदाताई पवार यांनी मगरपट्टा सिटी व नांदेड सिटीचे सर्वेसर्वा आणि प्रसिध्द उद्योगपती सतीश मगर व मगरपट्टा सिटी ग्रुप यांच्या पुढाकारातुन पुरंदर, बारामती, इंदापूर, कर्जत व जामखेड या तालुक्यातील 250 ते 300 महिलांना 85,000 मास्क बनविण्याची लाखो रुपयांची ऑर्डर मिळवून दिली आहे.आजचे तरुण आत्मनिर्भर बनु पाहत असताना,आज मात्र आमची ग्रामीण महिला मास्क बनविण्याच्या कामातून रोज 400 ते 500 रुपये कमवून घराला आर्थिक हातभार लावत आहे.
सतीश मगर यांच्या वतीने मगरपट्टा व नांदेड सिटी पुणे येथील निवासी प्रकल्पातील सदस्यांसाठी हे 85000 मास्क वाटप करण्यात येणार असून,हे सर्व काम ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित शारदा महिला संघाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना उपलब्द करुन दिले आहे.यासाठी, सुनंदाताई पवार व स्नुषा कुंती रोहित पवार यांनी विशेष कष्ट घेऊन, ग्रामीण भागातील गरिब,गरजू व होतकरु महिलांना रोजगार उपलब्द करुन दिला आहे.
मागील आठवड्यात प्रत्यक्षात मास्क उत्पादनाला सुरुवात करण्यात आली असून, यामध्ये  कापड कटींग, शिलाई, प्रिंटिंग व पॅकिंग अशा विविध जबाबदार्‍या महिला बचत गटांना देण्यात आल्या आहेत.तर निवडक महिला बचत गटांना मास्क शिवण्याचे  प्रशिक्षण,मालाची गुणवत्ता,  मूल्यमापन,कच्चा माल वेळेवर पोहचविणे असे सर्व काम संस्थेच्या शारदा महिला संघाचे अधिकारी करत आहेत.

No comments:

Post a Comment