21 व्या शतकात लग्नाच्या गाठी स्वर्गात नव्हे, तर मराठा सोयरीकमध्येच - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 13, 2020

21 व्या शतकात लग्नाच्या गाठी स्वर्गात नव्हे, तर मराठा सोयरीकमध्येच

 21 व्या शतकात लग्नाच्या गाठी स्वर्गात नव्हे, तर मराठा सोयरीकमध्येच
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः असं म्हणतात ’लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात’, पण आम्ही म्हणतोय ’लग्नाच्या गाठी इथे अशोक कुटे सरांच्या मराठा सोयरीक ग्रुपकडेच बांधल्या जातात’ अशी प्रतिक्रिया नुकतीच नेवासा येथील डव्होकेट मा. रमेश पाठे साहेब, केंद्रप्रमुख अशोक घाडगे साहेब व इतर अनेक पालकांनी दिली आहे.
कोरोनासारख्या भयंकर संकटकाळी स्थळ पाहणे , लग्न जमवणे व लग्न पार पाडणे हया गोष्टी फार अवघड झाल्या आहेत. याबददल  नेवासा येथील 1 वधुपिता वकील  रमेश पाठे यांनी सविस्तर अनुभव कथन केला आहे.  4/5 महिन्यांपूर्वी मी माझ्या डॉक्टर मुलीसाठी मराठा सोयरीक ग्रुपला जॉईन झालो. त्यांनतर मला ग्रुपवर अनेक जवळची, मिञ परिवारातील बायोडाटे बघायला मिळाली. आश्यर्च म्हणजे हे सोयरीकचे राज्यव्यापी 11 व्हॉट्स प ग्रुप असल्याने मला स्थळांसाठी वेगवेगळया जिल्हयातुन फोन आले.  त्यावरून हया ग्रुपची व्याप्ती लक्षात येते.  त्यानंतर लगेच केंद्रप्रमुख मा. अशोक घाडगे साहेबांच्या मुलाबरोबर मुलीचे लग्न जमुन नुकताच सोशल डिस्टंन्स पाळुन साखरपुडा पार पडला.  घाडगे कुटूंब हे मराठा व मराठी सोयरीक ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य आहेत.  हया सोयरीक ग्रुपसाठी भास्कर नरसाळे, विलास खाटीक, अ‍ॅड. बापुसाहेब गायके, राजेंद्र वाबळे, राजेंद्र गायकवाड, संदीप गारूळे, प्रा. भोसले सर, भोर सर, ज्ञानेश्वर जाधव सर, चंद्रकांत काळे, रमेश सावंत, सोमनाथ गायकवाड, सुनील शिंदे , दरंदले पाटील, पठारे मॅडम, प्रमोद झावरे, अर्जून झरेकर व अनेक वकील मंडळींच बहुमोल सहकार्य लाभत आहे.  
कोरोनाच्या अडचणीमुळे  कुटे सरांनी ऑनलाईन मेळावे घेण्यास सुरूवात केली आहे.  यामध्ये पालकांचा बाहेर फिरण्याचा, स्थळे शोधण्याचा ञास वाचला आहे.  फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-टयुब, स्वतंत्र मोबाईल प इ. अनेक माध्यमातुन पालकांना घरबसल्या अनेक स्थळे बघायला मिळत आहेत.  त्यामुळे आता सर्व जातीधर्मांचे पालकांनी स्थळांसाठी मराठी सोयरीक ग्रुपला संपर्क करावा असे मत वरपिता अशोक घाडगे यांनी व्यक्त केले आहे. तसेच सोयरीक ग्रुपने हुंडाबंदी, शॉर्टकट लग्न , वृक्षारोपन इ. अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.  येत्या  19 जुलै रोजी 3 रा ऑनलाईन मेळावासाठी 8847724680 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन ग्रुपने केले आहे.

No comments:

Post a Comment