सा.बां. शाखाअभियंता गर्ज यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 24, 2020

सा.बां. शाखाअभियंता गर्ज यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी

सा.बां. शाखाअभियंता गर्ज यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बाळगले मौन ?
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे  ज्यामुळे त्यांना गत सहा वर्षापासून पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत ठेवले आहे याचा खुलासा करावा गेल्या सहा वर्षात पाथर्डी तालुक्यात शाखाअभियंता विक्रम गर्ज यांच्या कारकिर्दीत ठेकेदारांनी केलेल्या कामाची चौकशी लावावी व अनैसर्गीक संपत्तीची इडी आयकर विभाग मार्फत चौकशी करावी अन्यथा बेमुदत उपोषणास बसणार आहे.
- शैलेंद्र जायभाये, माहीती अधिकार महासंघ पाथर्डी

नगरी दवंडी/प्रतिनिधीपाथर्डी ः तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांची नेमनुक झाल्यापासून आजतागायत पाथर्डी उपविभागीय कार्यालयात गत सहा वर्षापासून कार्यरत आहेत शासन निर्णयानुसार सरकारी अधिकार्याची तीन वर्षात बदली होत असते.
माञ पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे अशी ज्यामुळे गत सहा वर्षापासून ते पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय कार्यालयात आजही सेवेत आहेत आजही हा प्रश्न अनुत्तरीत आहे गत नऊ वर्षात पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे शाखाअभियंताविक्रम गर्ज यांनी अनेक भ्रष्टाचाराची कामे ठेकेदारांशी हात मिळवणी करुन केले आहेत पाथर्डी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणारे तालुक्यातील रस्त्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे करुन लाखो रुपयांची बील ठेकेदारास मिळवुन दिली आहेत.
पाथर्डी तालुक्यातील रहिवासी शाखाअभियंता विक्रम गर्ज यांचे राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी हितसंबंध असल्याने बदली केली जात नसल्याचे बोलले जात आहे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांनी कमवलेल्या अनैसर्गीक संपत्तीची आयकर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी तसेच शासनाची फसवणूक करुन करोडो रुपयांची संपत्ती जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा व शाखाअभियंता विक्रम गर्ज यांची जिल्हाबाहेर तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी माहीती अधिकार महासंघ पाथर्डी तालुकाध्यक्ष शैलेंद्र जायभाये यांनी  लेखी निवेदनाद्वारे केली आली आहे पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तसेच जिल्हा कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता कुठलाही  प्रतिसाद मिळाला नाही आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता विक्रम गर्ज यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment