भाजपच्या कार्यकारीणीत मुंडे गटाचे वर्चस्व ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 20, 2020

भाजपच्या कार्यकारीणीत मुंडे गटाचे वर्चस्व ?

भाजपच्या कार्यकारीणीत मुंडे गटाचे वर्चस्व ?
भाजपा कार्यकारणीत पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष नेते देंवेंद्र फडणवीस उपाध्यक्षा प्रीतम मुंडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्ष तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी पक्षाची विचारधारा केन्द सरकारच्या योजना गोरगरीबापर्यत  पोहचवण्यासाठी पदाधिकारी यांनी प्रयत्न करावेत नविन पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.  
                                - आमदार मोनिका राजळे

नगरी दवंडी/प्रतिनिधीपाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची तालुका कार्यकारणी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष मानिक खेडकर यांनी जाहीर केली यामधे मुंडे गटाचे वर्चस्व पहायला मिळाले नव्या कार्यकारणीत भाजपा तालुका उपाध्यक्षपदी लोकनेते कैलासवाशी गोपिनाथ मुंडे यांचे समर्थक व  माजी मंञी पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय संजय किर्तने यांची निवड करण्यात आली.
तालुका चिटणीसपदी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वामनराव किर्तने यांची निवड करण्यात आली तसेच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा काशीबाई गोल्हार यांची निवड करण्यात आली आहे भाजपच्या तालुका सदस्यपदी अर्चना अशोक खरमाटे सुरेखा राजेंद्र ढाकणे आबासाहेब खेडकर सोसायटीचे संचालक बाळासाहेब गोल्हार सुनिल अंदुरे शिक्षक सोसायटीचे संचालक वसंतराव खेडकर यांची निवड करण्यात आली आहे आमदार मोनिका राजळे यांना विधानसभा निवडणुकीत भगवानगड परिसर व भालगाव गटातून भरघोस मताधिक्य मिळवण्यात पंकजा मुंडे समर्थकांनी पराकाष्ठा केली होती आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकारणीत मुंडे गटातील कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे तर काही जुन्या कार्यकर्त्यांना संधी डावलल्याने नाराजीचा सुर आवळला आहे एकुणच भाजपची पाथर्डी तालुक्यातील नविन कार्यकारणी कही खुशी कही गम अशीच आहे भाजपच्या नविन पदाधिकारी निवडीबद्दल आमदार मोनिका राजळे यांचे तालुकाध्यक्ष मानिक खेडकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment