दलित मोर्चावर पोलिसांकडून गुन्हे दाखल तर; सरपंच परिषद मोर्चावर गुन्हे दाखल करणार का ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 20, 2020

दलित मोर्चावर पोलिसांकडून गुन्हे दाखल तर; सरपंच परिषद मोर्चावर गुन्हे दाखल करणार का ?

दलित मोर्चावर पोलिसांकडून गुन्हे दाखल तर;
सरपंच परिषद मोर्चावर गुन्हे दाखल करणार का ?

सरपंच शासनाचे जावई आहेत का ? दलित संघटनेचा पोलिसांना खडा सवाल !

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तहसिल कार्यालयावर गिडेगांव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची सी.आय.डी चौकशीच्या मागणीसाठी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी तहसिल कार्यालयावर शुक्रवार (दि. 17) रोजी काढलेल्या मोर्च्यावर नेवासा पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी मोर्चेकर्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.तर याच दिवशी पंचायत समिती कार्यालयावर सरपंच परिषदेने विविध मागण्यांसाठी नेवासा तालूक्यातील सरपंचांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशव्दात आंदोलन केले या सरपंचांच्या मोर्चेकर्‍यांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही सरपंच शासनाचे जावई आहेत काय असा सवाल युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे नेते शामराव सोनकांबळे यांनी केला आसून केवळ दलित समाजाच्या मोर्च्यावर कारवाई करुन सरपंचांच्या मोर्चाला सरकार पाठीशी घालणार आसेल तर तालूक्यात चक्का जाम आंदोलन हाती घेवू असा सज्जड इशारा रिपाईनेते शामराव सोनकांबळे यांनी दिला आहे.
यावेळी सोनकांबळे बोलतांना पुढे म्हणाले की,लोकशाहीत कायदा सर्वाना समान आहे तर मग युनायटेड रिपब्लिकन पार्टीने दलीत समाजाच्या अल्पवयीन मुलावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तपास सी.आय.डी कडे सोपविण्याच्या मागणीसाठी नेवासा तहसिल कार्यालयावर सोशल डिस्टन्स,मास्क,सॅनिटायझररचा वापर करत शिस्तबध्दरित्या मोर्चा काढला तरीही आमच्या मोर्च्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर दुसरीकडे पंचायत समिती कार्यालयावर याच दिवशी सरपंच परिषदेने आंदोलन केले माञ पोलिस प्रशासनाने या मोर्चावर गुन्हे दाखल करण्याचे धाडस का दाखले नाही मग मोर्चेकरी सरपंच परिषदेचे पदाधिकारी सरकारचे जावई आहेत का ? असा सवाल सोनकांबळे यांनी उपस्थित केला आहे.
दलित समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला झाला हा तपास सी.आय.डी कडे देण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी भिमसैनिक मोर्च्यात सहभागी झाले या मोर्चावर पोलिसांनी कारवाईक केली तर सरपंचांच्या मोर्चावर का कारवाई केली नाही याचे उत्तर प्रशासनाने द्यावे अन्यथा याबाबतचे सर्व सचिञ पुरावे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना देवून तालूक्याच्या प्रशासनाच्या प्रमुखावरच अनूसुचित जाती जमाती कायद्यान्वे कारवाई करण्याची मागणी करणार आसल्याचे यावेळी सोनकांबळे यांनी सांगितले आहे.कायदा जर सर्वांना समान आहे मग दलित मोर्च्यावरच गुन्हे दाखल का ? असा संतप्त सवालही यावेळी सोनकांबळे यांनी उपस्थित करुन जातीयवादाचे हे स्पष्ट उदाहरण नाही का ? याचा पुर्नउच्चारही यावेळी सोनकांबळे यांनी करुन सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment