नेवासा नगरपंचायतसमोर नगरसेवक व गटनेते यांचे एकदिवसीय उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 24, 2020

नेवासा नगरपंचायतसमोर नगरसेवक व गटनेते यांचे एकदिवसीय उपोषण

नेवासा नगरपंचायतसमोर नगरसेवक व गटनेते यांचे एकदिवसीय उपोषण
नगरी दवंडी/प्रतिनिधीनेवासा ः गेल्या अनेक दिवसापासून अनेक वेळा निवेदने देऊनहि नगरपंचायत प्रशासन कुठल्याच प्रकारची कारवाई स्वच्छता ठेकेदाराविरोधात करतांना दिसतं नाही ,तसेच नगरसेवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय ,राजकीय दबावाखाली बिले काढली जातात ,चालु कामे करून नागरिकांची फसवणूक केली जाते ,अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेवासा नगरपंचायत समोर विरोधी भा ज पा पक्षाचे नगरसेवक आणि गटनेते सचिनभाऊ नागपूरे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले .नेवासा नगरपंचायत समोर नगरसेवक तथा गट नेते सचिनभाऊ नागपुरे यांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनात  नगरसेवक सुनीलजी वाघ,संजय सुखदान,राजेंद्र मापारी, भारत डोकडे,निरंजन डहाळे,काँग्रेस कमिटीचे चे शहर अध्यक्ष रंजनदादा जाधव यांनी पाठिंब्याचे पत्र दिले, भास्करराव कनगरे, सतिष गायके,महेश पवार, विवेक नन्नवरे, विजय नहार, संदिप पारखे,गोपीनाथ माकोणे,बाळासाहेब शिंदे ,मुक्तारभाई शेख, अजित नरोला,रोहीत पवार,मनोज डहाळे, जंगबर पठाण, तान्हाजी गायकवाड, महेश लोखंडे, रावसाहेब चौधरी, भरत वालचुरे,मंगेश गोसावी यांच्या सह आनेक नागरिकांनी पाठिंबा दरशीवला व मागन्या पुर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन छेडन्यात येईल.असा इशारा यावेळी त्यांनी दिला .

No comments:

Post a Comment