पारनेर तालुका मराठी पत्रकारसंघाचे वतीने कोरोना योध्दा पुरस्कार जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 4, 2020

पारनेर तालुका मराठी पत्रकारसंघाचे वतीने कोरोना योध्दा पुरस्कार जाहीर

पारनेर तालुका मराठी पत्रकारसंघाचे वतीने कोरोना योध्दा पुरस्कार जाहीर
         पारनेर(प्रतिनिधी) :  पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने  कोरोना योध्दा पुरस्कार नुकतेच जाहीर केले आहेत.वडझिरे येथे झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीमधे हि पुरस्कार यादी जाहीर झाली. कोरोना विषाणुच्या संकटामधे पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसुल विभाग, शिक्षण विभाग, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी आपण आपल्या जीवा वर उदार होवुन, समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतुने अहो रात्र झटत समाजातील गरीब,  गरजु लोकांना,अन्नधान्य,किराणा किट्स, मास्क,सॅनिटायझर, अर्सेनिक गोळ्यांचे वाटप केले. त्यांच्या कार्याची दखल घेत पारनेर तालुका पत्रकार संघाचे वतीने त्यांना  कोरोना योध्दा  या पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याची माहीती अध्यक्ष दत्ता गाडगे यांनी बैठकीमधे दिली.
 

         या पुरस्कारांमधे शिवबा संघटना,पारनेरचे आमदार निलेश लंके, तहसिलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, जि.प,चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, पारनेर पं.स.सदस्य डॉ.श्रीकांत पठारे,डॉ.आकाश सोमवंशी,शिक्षक आनंदा झरेकर, आरोग्यसेविका सोनाली गुंड, ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत साळवे आदींना हे पुरस्कार जाहील केलेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्यामुळे, कुठलाही डामडौल न करता,गर्दी न करता,साध्या पध्दतीने सदरचे पुरस्कार त्या त्या विभागामधे सर्व पत्रकारांसह जावुन देणार असल्याची माहीती दत्ता गाडगे यांनी दिली.
 
           सदरच्या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष दत्ता गाडगे,मार्गदर्शक अनिल चौधरी, अरुण आंधळे पाटील,भगवान श्रीमंदीलकर, रामदास नरड,माजी अध्यक्ष सतीष रासकर,यांचेसह इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे तालुका अध्यक्ष पोपट पायमोडे, संघटनेचे सचिव मनिषा बाबर, उपाध्यक्ष विनोद गायकवाड,राम तांबे,दत्ता ठुबे,खजिनदार संदिप गाडे, पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, संपर्कप्रमुख संजय मोरे, प्रसिध्दी प्रमुख श्रीनिवास शिंदे,सहसचिव बाबाजी वाघमारे,  सागर आतकर,पत्रकार सुधिर पठारे, संपत वैरागर,आनंदा भुकन, विजय रासकर,चंद्रकांत कदम, गंगाधर धावडे,किरण थोरात,प्रेस फोटोग्राफर बाळा साहेब कोकाटे, निलेश शेंडगे, निलेश जाधव, पोपट शिंदे आदी पत्रकार हजर होते.प्रास्ताविक व सुत्रसंचालन कारभारी बाबर सर,यांनी तर आभार बाबाजी वाघमारे यांनी मानले.


No comments:

Post a Comment