बेलापूरात चोरट्यांचा दारु दुकानावर डल्ला 80 हजाराचा माल लंपास - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 4, 2020

बेलापूरात चोरट्यांचा दारु दुकानावर डल्ला 80 हजाराचा माल लंपास

बेलापूरात चोरट्यांचा दारु दुकानावर डल्ला 80 हजाराचा माल लंपास

बेलापूर  (प्रतिनिधी  )-बेलापूर नगर रस्त्यावर असणार्या दारुच्या दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी 85 हजार रुपयांचा माल लंपास केला असुन बेलापूर  पोलीसांनी तातडीने डाँग स्काँडला पाचारण केले  बेलापूर नगर रस्त्यालगत के जी गोरे यांचे देशी दारुचे दुकान आहे सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान उघडण्यास गेले असता दुकानाचे कुलुप उघडे असल्याचे दिसले त्यांनी तातडीने बेलापूर पोलीसांना घटनेची खबर दिली बेलापूर पोलीसांनी तातडीने नगर येथील डाँग स्काँडचे पोलीस उपनिरीक्षक एस बी बावळे आर आर विटेकर पी एन डाके वाहक एस आर रोकडे यांना पाचारण केले  हे पथक  डाँग मिस्कासह बेलापूरात पोहोचले  चोरट्यांनी कुलुप तोडताना वापरलेली काही हत्यारे तेथेच पडलेली होती त्या हत्याराच्या वासावरुन  मिस्का  डाँग  काही अंतरावर गेला व परीसरातच घुटमळला या वरुन चोरटे वहानातुन आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे गोरे यांच्या म्हणण्या नुसार भिंगरी दारुचे 26 बाँक्स तसेच एक बिअरचा बाँक्स असा ऐंशी हजार रुपयाचा माल व गल्ल्यातील पाच हजार रुपयाची चिल्लर असा 85 हजार रुपयांचा माल चोरीस गेला आहे   बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे राशिनकर निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ हे पुढील  करत आहे


            

No comments:

Post a Comment