स्वाभिमानीच्या दूध आंदोलनास शेवगावात प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 21, 2020

स्वाभिमानीच्या दूध आंदोलनास शेवगावात प्रतिसाद

स्वाभिमानीच्या दूध आंदोलनास शेवगावात प्रतिसाद

महाराष्ट्रातील दूध उत्पादन हा प्रामुख्याने भूमिहीन शेतमजूर आहे ब्लॉकडाऊन मुळे अगोदरच त्याचा रोजगार हिरावून गेल्यामुळे अशा परिस्थितीत त्याला दहा रुपये कमी दराने दूध विकावे लागत आहे तरीही केंद्र व राज्य सरकारला जाग येत नाही, म्हणून दूध उत्पादक शेतकर्‍यांना गाईच्या दुधाला 3/5 फॅट नुसार पंचवीस रुपये दर देणे बंधनकारक आहे तरच शेतकरी व दूध व्यवसाय टिकेल अशी आशा आहे.
- रावसाहेब लवांडे
पक्ष जिल्हा अध्यक्ष

नगरी दवंडी/प्रतिनिधी
शेवगाव ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक दूध बंद आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिवस अगोदर संपूर्ण डेरी चालत दूध संकलन केंद्र चालक व शेतकरी यांना शेतकरी संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आले की दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान शासनाकडून मिळावे व पुढील तीन महिन्यांसाठी सरकारने थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करावे म्हणजे 3/5 फॅट  नुसार पंचवीस रुपये दर दुधाला देण्यात यावा या प्रमुख मागणीसह केंद्र शासनाने दहा हजार दूध पावडर आयात करण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा, 30 हजार टन दूध पावडर चा बफर स्टॉक तयार करावा तसेच दूध पावडर साठी प्रति किलो 30 रु. देण्यात यावेत त्याचप्रमाणे दूध पावडर, तूप,दही,बटर, श्रीखंड, पनीर इत्यादी दुग्धजंन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात यावी व शेतकर्‍यांना शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोडकळीस येऊ नये, मोठ्या प्रमाणात वाढलेले पशुखाद्याचे दर, यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सर्व दूध संकलन केंद्रांना आव्हान करण्यात आले आहे की की त्यांनी आपले संकलन केंद्र बंद ठेवून या आंदोलनास सहकार्य केले आहे,
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हा अध्यक्ष राऊसाहेब लवांडे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, संघटना तालुका अध्यक्ष प्रवीण मस्के, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, अमोल देवढे, मेजर अशोक भोसले, संदीप मोटकर, दादा पाचरणे, नानासाहेब कातकडे, प्रशांत घुमरे,नारायण पायघन, संतोष गायकवाड इत्यादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यांमध्ये दूध आंदोलन यशस्वी केले.

No comments:

Post a Comment