जागतिक कुंड रांजणखळगे पर्यटनक्षेत्र हिरवाईने नटले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 21, 2020

जागतिक कुंड रांजणखळगे पर्यटनक्षेत्र हिरवाईने नटले

जागतिक कुंड रांजणखळगे पर्यटनक्षेत्र हिरवाईने नटले
कोरोना महामारीने पर्यटकांचा मात्र हिरमोड

तालुक्यातील सर्वच धार्मिक तिर्थक्षेत्रांचा विकास कामांच्या कायापालट करणांर असुन,राज्याच्या पर्यटन योजना विकास निधी,आमदार निधीतुन जास्तीत,जास्त निधी उपलब्द करून येथिल कुंडपर्यटन क्षेत्राची भाविकांना व पर्यटकांना जागतिक दर्जाचा हेवा वाटावा अशी जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण करणांर आहे.
- आमदार निलेश लंके


जागतिक दर्जाच्या कुंडपर्यटन क्षेत्राच्या विकासकामांसाठी 2020-21 चा आराखडा(मास्टर प्लॅन)मध्ये श्री क्षेत्र कुंड येथिल पर्यटक विसावा केंद्र,भाविक,पर्यटकासाठी प्रसादालय,लहान मुलांसाठी बोटींग प्रकल्प,भव्य गार्डन,नाना,नानी पार्क ,गट नंबर 67 व 2439 ला वॉल कंपाऊड,मंदिरासमोर पुर्व -पश्चिम कँक्रीट रस्ता,गट नंबर 67 ते पर्यटक विसावा केंद्रापर्यत उत्तर-दक्षिण कँक्रीट रस्ता,कुंड रस्ता ते शिरुर(जि.पुणे)रस्ता बायपास कँक्रीट रस्ता,अंतर्गत गटार येजना,वाहन पार्कीगं व्यवस्था,सुसज्य भव्य असे भक्तनिवास अशी अनेक नविन विकासकामे लवकरच आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांने चालू होणांर आहे.
- प्रभाकर कवाद (अध्यक्ष, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट)


नगरी दवंडी/प्रतिनिधीपारनेर ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली निघोज(ता.पारनेर)येथिल मळगंगा माता मंदिर परीसर,जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंडपर्यटन क्षेत्र हिरवाईने नटले असुन पर्यटकांना एक प्रकारे भुरळ घालत आहे,मात्र कोरोनाच्या महामारीने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.मार्चच्या मध्यासह गेल्या चार महीण्यां पासुन प्रशासनाच्या आदेशानुसार राज्यातील तिर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे बंद करण्यांत आली त्यामुळे पर्यटका बरोबरच अनेकांचा रोजगार पण बुडाला आहे.
कुकडी नदीच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहाने निर्माण झालेल्या नदिपात्रात रांजणखळग्यांची निर्मिती झाली असल्यांचे संशोधकांचे म्हणणे आहे, त्याला स्थानिक भाषेत कुंड म्हणतात.निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहताना देहभान विसरायला होते.जागृत अशा मळगंगा मातेचे दर्शन व नंतर निसर्गाचे रांजणखळग्यांच्या रुपातील मनोहारी दर्शन मनाला प्रसन्न करते.देशभरातील पर्यटकांसह देश विदेशातील अभ्यासक याठिकाणाला आवर्जून भेट देण्यासाठी येतात.आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे.
1990 च्या दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने जागतिक पातळीवर नोंद घेवून जगभरात गौरवविलेले कुंड रांजणखळगे हे निघोज गावापासून केवळ दोन कि.मी.वर आहे.कुकडी नदीवरील जगप्रसिध्द व आशिया तील सर्वात मोठे (पॉट होल्स) रांजणखळगे भाविक व पर्यटकांना पाहण्यांचा अदभुत नजराना या ठिकाणी आहे.वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळ्या रूपातील सौदर्य पहावयास मिळते.कितीही दुष्काळ पडला तरी येथील पाण्याची पातळी कमी होत नाही व हि परंपरा गेल्या कित्येक शतकापासून तशीच आहे असे स्थानिक जानकार सांगतात.

No comments:

Post a Comment