सुराज्य फौंडेशनच्यावतीने शनिवारी शेतकर्‍यांना युरियाचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 15, 2020

सुराज्य फौंडेशनच्यावतीने शनिवारी शेतकर्‍यांना युरियाचे वाटप

सुराज्य फौंडेशनच्यावतीने शनिवारी शेतकर्‍यांना युरियाचे वाटप


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
शेवगाव ः सुराज्य रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन च्या वतीने खा. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता वडुले खुर्द (ता. शेवगाव) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात  10 गावातील गोरगरीब अल्प भूधारक शेतकर्‍यांना प्रति शेतकरी 2 गोण्या युरिया खताचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सुराज्य रुरल डेव्हलपमेंट फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर शिरसाठ यांनी दिली.
खा. सुप्रियाताई सुळे व  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण हे दोन्ही नेते राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम करतात. या नेत्यांचा आदर्श घेऊनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आगळा वेगळा कार्यक्रम नगर जिल्ह्यात प्रथमच होत आहे. या कार्यक्रमास दोन्ही नेत्यांनी रितसर परवानगी दिली आहे. सध्या गोरगरीब शेतकर्‍यांना उज्वला युरिया खत उपलब्ध होण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. अनेक खत विक्रेते शेतकर्‍यांची अडवणूक करीत आहेत. युरिया खत पाहिजे असेल तर इतर खत व बियाणे घ्यावे लागेल अशी सक्ती करीत आहेत. खत विक्रेत्यांची ही भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सुराज्य रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन अजिबात खपवून घेणार नाही. शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या खत विक्रेत्यांची गय केली जाणार नाही.
10 गावातील गोरगरीब व अल्पभूधारक शेतकर्‍यांची निवड करणे हे अत्यंत अवघड असे काम होते. मात्र या कामी आम्हाला क्षितिज भैय्या घुले युवा मंच व शेवगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याच बरोबर त्या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेकांचे सहकार्य लाभले आहे. कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून लॉकडाऊनचे सर्व नियम व अटी पाळून हा कार्यक्रम घेतला जाणार असून उपस्थितांनी मास्क लावणे, सॅनिटायझर चा वापर करणे, सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी होणार नाही. याची काळजी सुराज्य रूरल फौंडेशनच्या वतीने घेण्यात येणार आहे. तरी या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांना जास्तीत जास्त प्रमाणात युरिया खत उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याशी सतत संपर्कात आहे. शेतकर्‍यांना याबाबत काही अडचण आल्यास त्यांनी सुराज्य रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन चे कार्यकर्ते अक्षय आव्हाड भ्रमणध्वनी क्रमांक 7219532726 व सागर आंधळे भ्रमणध्वनी क्रमांक 7774931784 या वर संपर्क साधावा असे आवाहन सुधीर शिरसाठ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment