लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीतही संस्थेची घोडदौड कायम राखण्यात यश : श्रीगोपाल धूत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 15, 2020

लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीतही संस्थेची घोडदौड कायम राखण्यात यश : श्रीगोपाल धूत

लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीतही संस्थेची घोडदौड कायम राखण्यात यश : श्रीगोपाल धूत
रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीला 3 कोटी 73 लाखांचा नफानगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः येथील श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटी लि. या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच संस्थेचे चेअरमन श्रीगोपाल धूत यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यात सन 2019-2020 या आर्थिक वर्षाचा ताळेबंद संस्थेचे अंतर्गत लेखापरिक्षक एन.जे. लोहे ऍण्ड कंपनीचे सी.ए. पुनित व्होरा यांनी सभेसमोर सादर केला. संस्थेस सर्व तरतुदी वजा जाता 3 कोटी 73 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत संस्थेच्या नफ्यात यंदा 40 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. संस्थेकडे वर्षअखेर 75 कोटी रुपयांच्या ठेवी असुन कर्ज वितरण 52 कोटी रुपयांचे झाले आहे, अशी माहिती चेअरमन श्रीगोपाल धूत यांनी दिली.
सभेत चेअरमन श्रीगोपाल धूत, व्हा. चेअरमन विश्वनाथ कासट, राजेंद्र गुुजराथी, प्रकाश गांधी, लक्ष्मीकांत झंवर, किसनलाल बंग, गोपाल मणियार, राजेेंद्र मालू, राजेंद्रकुमार कंत्रोड, श्रीमती अनुरिता झगडे, देवराव साठे हे सर्व संचालक तसेच व्यवस्थापक शशिकांत पुंडलिक, कुमार आपटे आणि संस्थेचे इतर सेवक उपस्थित होते. संस्थेने इतर बँकेत 56 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचे रिझर्व्ह फंड्स 21 कोटी 27 लाख रुपये इतके आहेत. 
संस्थेचा नेेट एन.पी.ए. शून्य आहे. संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजेे सर्व संचालक एकमताने सर्व निर्णय घेतात. संस्थेच्या कार्यालयात फक्त 13 सेवक काम करत असून ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. संस्थेचे अंतर्गत लेखापरिक्षक श्री.एन.जे.लोहे ऍण्ड कंपानीचे सी.ए. पुनित व्होरा यांनी संस्थेस वर्षभर योग्य ते मार्गदर्शन केले. चेअरमन श्रीगोपाल धूत म्हणाले की, वर्षभर सर्व संचालकांनी अतिशय मोलाची साथ दिली. लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीतही सभासद व ठेवीदारांच्या सहकार्यामुळेच संस्थेला भरीव व प्रशंसनीय कार्य करता आले असून संस्थेची घोडदौड कायम राहिली आहे. संस्थेच्या प्रगतीत या सर्वांचे मोठे सहकार्य आणि योगदान आहे.
व्हाईस चेअरमन विश्वनाथ कासट म्हणाले की, सध्या सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहचलेले असून कोरोनाच्या या कठीण काळामध्ये तातडीच्या गरजा भागविण्यासाठी अनेकांना सोनेतारण कजर्र् घेणे सोपे जाते. सध्याच्या काळातील नागरिकांची गरज लक्षांत घेऊन संस्था प्रती 10 ग्रॅम सोन्यावर 35 हजारापर्यंत अत्यल्प दराने सोनेतारण कर्ज उपलब्ध करून देत असल्याचे कासट यांनी सांगितले. सभेमध्ये सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करीत सर्व संचालक व कर्मचार्यांनी मास्क परिधान करून सहभाग घेतला. 

No comments:

Post a Comment