महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील डॉ. देसले यांच्यावर हल्ला करणार्‍या टोळीचा सूत्रधार गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 23, 2020

महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील डॉ. देसले यांच्यावर हल्ला करणार्‍या टोळीचा सूत्रधार गजाआड

महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील डॉ. देसले यांच्यावर हल्ला करणार्‍या टोळीचा सूत्रधार गजाआड

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः  महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील शाश्त्रज्ञ डॉ राहुल नवनाथ देसले ह्यांवर खुनी हल्ला करणार्‍या टोळीचा प्रमुख सूत्रधार गोरक्षनाथ रघुनाथ शेटे ह्यास राहुरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आज गजाआड केले.
19 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7.30 वाजता विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ राहुल देसले ह्यांचेवर विना नंबरच्या स्विफ्ट डिसायर या गाडीतून येऊन अज्ञात 4 जणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत त्याच दिवशी सदर घटनेचा गुन्हा राहुरी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला होता.सदरची घटना अतिशय संवेदनशील असल्याने हल्लेखोरांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध होउ शकत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह श्रीरामपुर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सौ दिपाली काळे ह्यांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करण्याचे आदेश उपाधीक्षक राहुल मदने व पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख ह्यांना दिले.राहुरी पोलिसांनी तपासासाठी पोलिस पथके तयार करून प्रमुख सूत्रधाराचा शोध सुरु केला.पोलिसांनी घटनेतील एक आरोपी भास्कर उ़र्फ माणिक नानासाहेब काचोले ह्यासघटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासात ताब्यात घेतले. त्याचेकडे घटनेची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला अखेर त्यास पोलीशि खाक्या दाखवताच त्याने सर्व घटनेच्या बद्दल सविस्तर माहिती राहुल मदने व मुकुंद देशमुख ह्यांना सांगितली.सदर प्रकारातील प्रमुख सूत्रधार गोरक्षनाथ रघुनाथ शेटे सहाय्यक सुरक्षा अधिकारी कृषी विद्यापीठ ह्याचे सांगण्या वरून भास्कर उ़र्फ माणिक नानासाहेब काचोले तौशिफ जमीर देशमुख व परवेज सय्यद ह्या 4 जणांनी हल्ला केल्याचे उघड झाले. आरोपी भास्कर उ़र्फ माणिक नानासाहेब काचोले ह्यास ताब्यात घेतल्यानंतर प्रमुख आरोपी सुरक्षा रक्षक गोरक्षनाथ शेटे फरार झाला होता.त्यास आज पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने पकडून त्यास अटक केली. ह्याकामी सदरची कामगिरी पोलिस उपाधीक्षक राहुल मदने ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके दिनकर चव्हाण सोमनाथ जायभाये ज्ञानदेव पथवे सचिन ताजने  रोहित पालवे ह्यांनी चोख कामगिरी केली.

No comments:

Post a Comment