राहुरीत दमदार पावसाची हजेरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 25, 2020

राहुरीत दमदार पावसाची हजेरी

राहुरीत दमदार पावसाची हजेरी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः शहरासह तालुक्यात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली . वांबोरीत तब्बल पाच इंच तर राहुरी शहरात अडीच इंच पाऊस झाला . मुळा धरण क्षेत्रातही पावसाची चांगली बॅटिंग झाली, परिणामी धरणात 24 तासात जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवक होत मुळा धरण साठा 10 टीएमसी वर पोहोचला आहे.
राहुरी शहर व तालुक्यात गुरुवारी (काल) सायंकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली . शहरात व परिसरात दीड तास जोरदार पाऊस झाला . बाजारपेठ ,शिवाजी चौक ,शनी चौक ,नवी पेठ, या भागात रस्त्यावरून पाणी वाहिले. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सर्वांधिक 119 मिलिमीटर पाऊस नोंद झाला. तालुक्याच्या पश्चिमेकडील ताहाराबाद, मल्हारवाडी, कानडगाव, म्हैसगाव कडील खरिपाचा व कमी पावसाच्या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे .दरम्यान मुळा नदीची उपनदी समजली जाणारी देव नदी काल सायंकाळपासून दुथडी भरून वाहत आहे नगर कडील भागातून नांदगाव , शिगवे , सडे , खडांबे , पिंपरी अवघड, देसवंडी या भागातून वाहणारी ही देव नदी दुथडी भरून वाहत आहे , देसवंडी जवळ जाणार्‍या नदीवरील पुलापर्यंत पाणी वाहत होते . ताहाराबाद मंडळात 60 मिलिमीटर पाऊस झाला . खरिपाच्या पिकांना हा पाऊस लाभदायक आहे.
गुरुवारी रात्री राहुरी येथे- 63 , देवळाली प्रवरा -57, सात्रळ -41, ताहाराबाद - 60 , वांबोरी -119 , ब्राह्मणी -41 तर टाकळीमिया येथे 24 मिलिमीटर पाऊस महसूल विभागाकडे नोंद झाला आहे . काल झालेल्या पावसामुळे राहुरी तालुक्याची पावसाची सरासरी आता शंभर टक्क्यांच्या पुढे गेली आहे . मुळा धरण क्षेत्रात कोतुळ खालील भागात पावसाच्या जोरदार बॅटिंग मुळे धरण साठ्यात 459 दशलक्ष घनफूट अर्थात जवळपास अर्धा टीएमसी पर्यंत पाण्याची वाढ होत आज सकाळी धरण साठा दहा हजार टीएमसी वर पोहोचला आहे.

No comments:

Post a Comment