मिरी परिसरात मुसळधार पावसाने ओढे-नाले तुडुंब - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 25, 2020

मिरी परिसरात मुसळधार पावसाने ओढे-नाले तुडुंब

मिरी परिसरात मुसळधार पावसाने ओढे-नाले तुडुंब

शंकरवाडी येथील पाझर तलावाच्या संरक्षक भिंतीवरील भराव खचल्याने भिंतीला तडा जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे साचलेले पाणी टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलावीत.अन्यथा साचलेले पाणी वाहून गेल्यास दुहेरी नुकसान होणार आहे.
- अशोक दहातोंडे, सरपंच

नगरी दवंडी/प्रतिनिधी
मिरी  ः पाथर्डी तालुक्यातील मिरी व परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पाझर तलावासह,ओढे-नाले तुडुंब भरले असून अनेक शेतकर्‍यांच्या शेतामध्ये देखील पाणी साचले आहे.तर काही दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की पाथर्डी तालुक्यातील मिरी,शंकरवाडी व आडगावसह परिसरात गुरुवारी रात्रभर झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे सर्व ओढे-नाले तुडुंब भरले आहेत तर मिरी-आडगाव रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील काहीवेळ बंद झाली होती.
या पावसात शंकरवाडी येथील पाझर तलावात मागील तीस वर्षातील सर्वाधिक पाण्याची आवक झाली आहे.त्यामुळे हा तलाव पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे तलावातील पाणी पाहण्यासाठी या भागातील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी मोठी गर्दी केली होती. परंतु या तलावाच्या संरक्षण भिंतीवरील भराव अनेक ठिकाणी खचलेला असल्याने आवक वाढत राहिल्यास भराव खचून पाझर तलाव फुटण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने तलाव फुटल्यास शंकरवाडी परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या घराला धोका पोहोचून शेतातील पिकांचे  व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे संबंधित विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, शंकरवाडी गावचे सरपंच अशोकराव दहातोंडे यांच्यासह राजेंद्र तागड आदींसह शंकरवाडी येथील अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. या पाझर तलावात वांबोरी चारीचे पाणी अत्यल्प प्रमाणात पोहोचत असल्याने या भागातील शेतकर्‍यांना नेहमीच पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता.परंतु अनेक वर्षांनंतर हा पाझर तलाव भरला असल्याने  या भागातील शेतकर्‍यांची चिंता तात्पुरत्या स्वरूपात मिटली आहे.

No comments:

Post a Comment