पारनेरमध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी पथकासह राबवली धडक मोहीम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 7, 2020

पारनेरमध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी पथकासह राबवली धडक मोहीम

पारनेरमध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी पथकासह राबवली धडक मोहीमनगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर शहरांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक होऊ शकतो तसेच अनेक नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाही म्हणून तहसीलदार ज्योती देवरे यांनी याविरोधात मोहीम राबवत पथकासह चौकामध्ये हातामध्ये काठी घेऊन थांबत विनाकारण फिरणार्‍या व नियमाचे पालन करत नसणार्‍या नागरिकांवर धडक कारवाई केली.
दुचाकीवर एक जण तीनचाकी गाडीवर  तीनजण चारचाकी गाडीवर तीन जण जाण्यास परवानगी आहे असे असताना या कारवाई त चक्क  एक पोलीस कर्मचारी  अडकला रमेश भास्कर दरेकर कॉन्स्टेबल भिंगार पोलीस स्टेशन दत्तात्रय मस्के हे दोघे दुचाकीवरून डबलसीट जाताना पारनेर येथे तहसीलच्या पथकाने आडवले त्यांनी यावेळी पथकावर हात उगारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रमेश भास्कर दरेकर या पोलीस कॉन्स्टेबल सह त्याच्या सोबत असणार्‍या वर पारनेर पोलीस स्टेशन मध्ये 188 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
पारनेर येथे आंबेडकर चौकामध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पथकाने नाकेबंदी केलेली आहे त्या ठिकाणी टू व्हीलर व फोर व्हीलर या गाड्यांवर येणार्‍या प्रवाशांवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन  न करणार्‍यावर वर कारवाई करण्यात आली अनेक दुचाकी चारचाकी वाल्यांनी महसूल व नगरपंचायत चे पथक कारवाई करत असल्याचे पाहून माघारी जाण्यास पसंती दिली. तसेच पोलिसांनीच प्रशासनाने घालून दिलेली नियमावली पाळली नाही तर नागरिकाकडून अपेक्षा काय करायची असा सवाल उपस्थित होत आहे.
  लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रथमच हातामध्ये काठी घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना सक्त ताकीद दिली तसेच काही लोकांच्यावर काठी चालवली त्यामुळे त्यावेळी लोक घरामध्ये थांबले तालुक्यामध्ये लॉकडाऊन चे सुरुवातीला काटेकोरपणे पालन केले गेले मात्र अलीकडे नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली मात्र आज पुन्हा तहसीलदार यांनी हातात काठी घेतल्यामुळे या गर्दीला लगाम बसेल अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.

No comments:

Post a Comment