कर्जतमध्ये एक दिवसात 5 व्यक्ती कोरोना बाधित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 23, 2020

कर्जतमध्ये एक दिवसात 5 व्यक्ती कोरोना बाधित

कर्जतमध्ये एक दिवसात 5 व्यक्ती कोरोना बाधित

नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः  तालुक्यात आज एका दिवसात विविध ठिकाणी 5 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सर्वत्र घबराट पसरली असून तालुक्यात सध्या 9 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
काल बुधवारी 22 जुलै रोजी तालुक्यात एकाच दिवशी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यामध्ये निंबोडी मध्ये मेंगडे वस्ती येथील 50 वर्षीय पुरुष,  कर्जत शहरात भांडेवाडी येथे कोरोना होऊन मयत झालेल्या जेष्ठ नागरिकांच्या 44 वर्षीय  21 एकर (राशीन रोड) येथे राहणार्‍या मयताच्या मुलीचा समावेश आहे. थेरवडी येथील 30 वर्षीय   थोरात वस्ती येथील पुरुष, कोळवडी येथील 64 वर्षीय पुरुष, याशिवाय मिरजगाव येथील 50 वर्षीय एक पुरुष कोरोना बाधित म्हणून जाहीर झाले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली आहे.
कर्जत तालुक्यात दिनांक 22 जुलै 2020 अखेर कोरोना (र्लेींळव 19) चे 26 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या असून कर्जत तालुक्याबाहेरील (इतर जिल्हा रहिवासी) असलेले सिद्धटेक -1 व राशीन मधील 2 असे तीन रुग्ण कर्जत तालुक्यात गृहीत धरलेले असून तालुक्यातील 23 व्यक्ती कोरोना बाधित झाल्या आहेत. कर्जत तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह  26 व्यक्ती पैकी कर्जत शहरामध्ये 06 तर कर्जत तालुक्यातील  ग्रामीण भागात 20 रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील 249 लोकांचे आत्तापर्यंत स्वब घेण्यात आले असून यातील 193 व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 31 व्यक्तीचे रिपोर्ट प्रलंबित आहेत, कोरोना झालेल्या रुग्णापैकी 15 लोक बरे ही झाले असून 2 व्यक्ती मात्र मयत झाल्या आहेत, यामध्ये मुंबई येथून राशीन येथे आलेली एक महिला तर भांडेवाडी येथील एक दिवस जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. दि 22 जुुलै अखेर तालुक्यात 9 रुग्ण ऍक्टिव्ह असून सीसीसी येथे 32 रुग्ण उपचार घेेेत आहेत, तालुक्यात सध्या 20 कंटेन्मेंट झोन असून यामध्ये कर्जत शहरात 5 तर ग्रामीण भागात 15 ठिकाणाचा समावेश आहे अशी माहिती प्रांत अर्चना नष्टे व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment