केतकी गाव ग्रामपंचायत हद्दीतील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 7, 2020

केतकी गाव ग्रामपंचायत हद्दीतील

केतकी गाव ग्रामपंचायत हद्दीतील

यशवंत नगर गावात रस्त्याची दुरवस्था


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः केतकी ग्रामपंचायत हद्दीतील यशवंत नगर या गावातील रस्ता ची अवस्था फारच खराब झाली आहे यशवंत नगर गावातील नागरिकांना रस्त्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत आहे. या विषयावर वांरवार ग्राम पंचायत ला निवेदन पत्र देऊन हि काहि रस्त्याचे काम झाले नाही. हा रस्ता लवकरात लवकर सिमेंट काँक्रीट केलं नाही तर येत्या काहि दिवसात केतकी ग्राम पंचायत कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल अस ग्राम पंचायत कार्यालय ग्रामसेवक पालवे साहेब यांना सांगण्यात आले. 
या वेळी अखिल भारतीय मेहतर समाज युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सनि भैय्या खरारे, उपाध्यक्ष तालेवार गोहेर, सचिव राहुल लखन, उप सचिव पवन छजलाने, सिद्धार्थ सोलंकी आदि गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment