नगर शहराच्या मध्यवस्तीतील कन्टेन्मेंट आणि बफर येत्या 04 जूनपर्यंत बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 22, 2020

नगर शहराच्या मध्यवस्तीतील कन्टेन्मेंट आणि बफर येत्या 04 जूनपर्यंत बंद

नगर शहराच्या मध्यवस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित
येत्या 04 जूनपर्यंत बंद 
 अहमदनगर, दि. 22- नगर शहराच्या काही भागात कोरोना रुग्ण सापडल्याने आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून तसेच लगतचा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. घोषित केलेल्या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री सेवा इ.व बफर झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 22 मे रोजी दुपारी 04 वाजेपासून दिनांक 04 जून, 2020 रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात असल्याचे आदेशात म्हटले आहे. 
जूने मनपा कार्यालय चौक, डॉ.होशिंग हॉस्पीटल चौक, शनी चौक, तख्ती दरवाजा मस्जीद, आशा टॉकीज, पंचपीर चावडी चौक, अंबिका महिला बँक ते जूनी मनपा चौक हा भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून तर यतीम खाना बिल्डींग, न्यामत खानी मोहल्ला, निंबाळकर गल्ली, तवकल वस्ताद तालीम, श्रीपाद ग्रंथ भांडार, घूमरे गल्ली, आदर्श शाळा, माणिक चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, बाळासाहेब देशपांडे दवाखाना, नांगरे गल्ली, जूना बाजार रोड, पटवेकर गल्ली, फुलसौंदर चौक, शिवम थिएटर, मनपा फायर स्टेशन, भाऊसाहेब फिरोदीया स्कूल हा भाग बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. शनी चौकातील डि.पी.जवळील रस्ता हा प्रवेशासाठीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.


            राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे 

No comments:

Post a Comment