जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अखिलेशकुमार सिंह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 2, 2020

जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अखिलेशकुमार सिंह

                    जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अखिलेशकुमार सिंह
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरात  कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना व चिंताजनक वातावरणात  लॉकडाऊन सुरू असताना नगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची आवश्यकता होती ती राज्यशासनाकडून पूर्ण झाली आहे.नगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्री अखिलेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्याचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढला आहे. पोलीस अधीक्षक इशू सिंधू हे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक संदीप मिटके यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.काही काळ जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली होती पण सागर पाटील व संदीप मिटके यांनी गुन्हेगारांना गजाआड करून चांगली कामगिरी केली होती.अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून श्री. अखिलेश कुमार सिंह हे लवकरच सूत्रे हाती घेणार आहेत.श्री.अखिलेश कुमार सिंह हे पोलीस उपायुक्त, परिमंडळ -7 मुंबई शहर येथे कार्यरत होते. त्यांना त्वरित नगरला जाऊन पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे पोलीस उपायुक्त मुंबई शहर पदाचा पदभार सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (नि.व.स) महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. अभिषेक त्रिमुखे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला आहे.बर्‍याच दिवसापासून नगरचे पोलीस अधीक्षक पद रिक्त होते, नगरला पोलीस अधीक्षक मिळावा म्हणून अनेक वेळा मागणी करण्यात आली होती, अखेर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक मिळाले.अखिलेश कुमार सिंह यांची बीड जिल्ह्यातील केज मधील कारकीर्द खूप चर्चेत राहिलेली आहे. केज मधील दारूधंदे व अनैतिक व्यवसाय त्यांनी कायमस्वरूपी बंद केले आहेत. कडक व शिस्तप्रिय असा त्यांचा लौकिक राहिलेला आहे.

No comments:

Post a Comment