मनपा स्वच्छता निरीक्षकांस मारहाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 2, 2020

मनपा स्वच्छता निरीक्षकांस मारहाण

                             मनपा स्वच्छता निरीक्षकांस मारहाण
                         नगरसेविकेच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल!
 नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नागापूर गावठाण मनपा कार्यालयाजवळ औषध फवारणी करत असताना नगरसेविकेचे नातेवाईकांनी मारहाण केल्याची फिर्याद श्री सुरेश वाघ यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेली आहे.सदर घटनेची हकीकत अशी की आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना मार्फत शहर परिसर व उपनगरांमध्ये औषध फवारणी चे काम सुरू आहे. बुधवार रात्री एकच्या सुमारास स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ व अविनाश हंसऔषध फवारणी करत असताना नगरसेविकेच्या नातेवाईकांनी आम्ही सांगू ते थेच औषध फवारणी कर असे सांगून दमदाटी करण्यास सुरुवात केली.या मारहाणीत दोन कर्मचार्‍यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश भाकरे व अन्य आठ जणांवर कलम 353 व कलम 332 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment