अहमदनगर जिल्हा बँन्ड मालक संघटना व प्रभात ब्रॉस बॅन्ड यांच्यावतीने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 2, 2020

अहमदनगर जिल्हा बँन्ड मालक संघटना व प्रभात ब्रॉस बॅन्ड यांच्यावतीने

 अहमदनगर जिल्हा बँन्ड मालक संघटना व प्रभात ब्रॉस बॅन्ड यांच्यावतीने
             जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांच्या हस्ते किराणा वाटप
नगरी दवंडी /प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा बँन्ड मालक संघटना व प्रभात ब्राँस बँन्ड ( अ.नगर) यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष श्री.शांताराम राऊत यांच्या हस्ते अ.नगर शहरातील व बुलढाणा जिल्ह्यातील प्रभात बँन्डचे काही कलावंत अश्या ऐकुण 150 कुटुंबांना किराणा वाटप आज ह्या ठिकाणी केले.
आज कोरोना सारख संकट देशावर आसतांना बँन्ड कलावंतांनवर सिजनचा वेळेस उपासमारीची वेळ आली आहे त्यावेळी आपण बँन्ड मालक ह्या नात्याने माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत मी देत आहे तसेच हे कलावंत आम्हाच्यासोबत रात्र दिवस काम करत आसतांना त्यांच कुटुंबांची काळजी करणे हे माझे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येक बँन्ड मालकाने पार पाडावे. तसेच धुळे जिल्हा बँन्ड संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. शामभाऊ संधानशिव यांनी सुध्दा धुळे जिल्ह्यातील बँन्ड कलावंतांना जी मदत देऊन काळजी घेतली त्यांचे ही मी अ.नगर बँन्ड संघटनेच्यावतीने आभार मानतो. आज आपला बँन्ड  कलावंत जगला तर बँन्डची परंपरा जिवंत राहु शकते म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व बँन्ड मालकांना विनंती करतो की आपण सुध्दा आपल्या कामगारांची कळजी घ्या. सरकार आपल्याला मदत करेल तेव्हा करेल पण तो पर्यंत आपण आपला कामगार जगवा.हे किराणा वाटप करतांना प्रभात बँन्डचे संचालक प्रकाश राऊत  गौरव राऊत व राऊत परिवार उपस्थित होता.

No comments:

Post a Comment