कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 1, 2020

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज

               कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज
आ.जगताप - शासनाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करुन सामाजिक बांधिलकी जपावी

नगरी दवंडी /प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे. या भूमीमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. संतांच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची खरी गरज आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली पाहिजे. यासाठी या विषाणूवर मात करण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करुन नगर शहर कोरोनामुक्त करण्यास योगदान द्यावे. शासन व जिल्हा प्रशासन यांच्या आदेशाचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. अन्न औषध पुरवठामंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे शहरात फवारणीसाठी केमिकल औषध उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्यानंतर लगेच इंडिया केमिकलचे चंद्रकांत मुथा यांना सामाजिक बांधिलकी जपत 2 टन सोडियम हायपोक्लोराईड केमिकल फवारणीसाठी दिले आहे. त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.इंडिया केमिकल्स कंपनीच्यावतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात फवारणीसाठी आ. संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार 2 टन सोडियम हायपोक्लोराईड केमिकल फवारणीसाठी महापालिकेकडे सुपूर्त केले. यावेळी कंपनीचे चंद्रकांत मुथा, मीनाताई मुनोत, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, माजी नगरसेवक संजय चोपडा, आशिष मुथा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत मुथा म्हणाले की, आपल्यावर कोरोना या विषाणूचे जे संकट आले आहे, त्याला तोंड देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 
आ. संग्राम जगताप या कामासाठी आवाहन करीत आहेत. सर्वांनी मदतीचा हात द्यावा. त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही लगेच नगर शहरात फवारणीसाठी 2 टन सोडियम हायपोक्लोराईड केमिकल फवारणीसाठी महापालिकेकडे सुपूर्त केले, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment