श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानकडून सॅनिटायझर व डेटॉल साबणांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 3, 2020

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानकडून सॅनिटायझर व डेटॉल साबणांचे वाटप

    श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानकडून  सॅनिटायझर व डेटॉल साबणांचे वाटप
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः देशात कोरोनाचे संकट असताना आता देवस्थान सुध्दा पुढे सरसावत आहेत. महाराष्ट्रात अनेक देवस्थान पुढे येऊन कोरोना विषयी जनजागृती करत असुन गावामध्ये जावून वैद्यकीय सेवा देत आहेत. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या तर्फे   सामाजिक बांधिलकी जपत सावरगांव यांच्याकडून धनगरवाडी या गावामध्ये डेटॉल साबण,सेनीटायजर वाटप करूण,औषध फवारणी करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांना कोरांना विषयी सतर्कता पाळावी असे आवाहन केले. तसेच देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दादासाहेब चितळे सर,आपले सरकार जिल्हा व्यवस्थापक मच्छिंद्र चितळे
सावरगांव चे सरपंच राजेंद्र म्हस्के  देवस्थान कर्मचारी अयुब शेख धनगरवाडी सरपंच बाबासाहेब चितळे,अशोक गाढे बाळू पोपट चितळे मिठु चितळे दादा केशव चितळे गणेश म्हस्के रमेश चितळे प्रकाश  चितळे बबन चितळे अशोक पोपट चितळे अजिनाथ गाढे  आदी ग्रामस्थ उपस्थित होते

गावातील नागरिकांने घराबाहेर न निघता घरातच थांबावे व प्रशासनाला सहकार्य करावे, व अफवावर विश्वास ठेवू नये, असे मच्छिंद्र चितळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment