अहमदनगर शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 3, 2020

अहमदनगर शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम

                         अहमदनगर शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम
                  डोंबारी बांधवांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण जग चिंतेत आहे. सुुरुवातीपासूनच केंद्र व राज्य सरकारने कठोर पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात ठेवून ती पूर्वपदावर आणण्यासाठी व  कोणीही उपाशी राहू नये, यासाठी योग्य नियोजन केलेले आहे. तसेच कोरोना या संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होवू नये या करता महाराष्ट्र राज्यात संचारबंदी आदेश देण्यात आलेले आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलिस दलाकडून सर्व नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता घरात राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.अशी परिस्थिती असताना अहमदनगर शहर व परिसरातील डोंबारी समाजातील बांधव जे दररोज रस्त्यावर खेळ करून, गावा गावात  जत्रा मध्ये खेळणी विकून, सर्कस करून  उपजीविका चालवतात त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली होती. अहमदनगर शहर पोलिस दलाने याची दखल घेत अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर, सागर पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे डोंबारी समाजातील बांधवांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी शुक्रवारी डोंबारी बांधवांना उपजीविकेसाठी गहू, तांदूळ, तेल, दाल व इतर किराणा/जीवनावश्यक वस्तू साहित्याचे वाटप केलेले आहे. अहमदनगर शहर पोलीस उपाधिक्षक श्री.संदीप मिटके, पी.एस.आय. महाजन कोतवाली पो.स्टे अहमदनगर शहर पोलिस दल व स्वयंसेवी संस्थेचे चे श्री. हरजीत वधवा, श्री.प्रशांत मुनोत यांचे  डोंबारी बांधवांनी आभार मानले असून अहमदनगर शहर पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे  यावेळी अहमदनगर पोलिस दलाच्या वतीने शहर उपाधिक्षक श्री. संदीप मिटके यांनी कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन उच्च स्तराचे उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कारण शिवाय रस्त्यावर फिरू  नये, गर्दी करू नये,  प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नये,  अहमदनगर पोलिस दलास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment