सभापती सुनिता दौंड यांची पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक महिन्याचे वेतन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 3, 2020

सभापती सुनिता दौंड यांची पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक महिन्याचे वेतन

सभापती सुनिता दौंड यांची पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक महिन्याचे वेतन
            आर्थिक मदत करत नैतीक जबाबदारी दाखवण्याचे केले आवाहन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः जगात कोरोणासारख्या विषाणुमुळे संसर्ग वाढुन जगात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत भारतात व महाराष्टात कोरोणासारख्या विषाणुमुळे संसर्ग दिवसेदिवस वाढत असून आजतागायत बारा नागरीकांचा यात मृत्यु झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोणासारख्या विषाणुला हरवण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे
तसेच देशातील नागरीकांना उद्देशुन कोराणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोराणाबाधीतांच्या वैद्यकीय उपचारासाठी व देशातील गोरगरीब मजुर कामगारांना मदत करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवहान करुन पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत देण्याचे आवहान केल्यानंतर भारतरत्न रतन टाटा अनिल अंबानी सचिन तेंडुलकर लता मंगेशकर इत्यादी कला क्रिडा साहीत्य राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेञातील मान्यवरांनी करोडो रुपयांच्या आर्थिक मदतीचा ओघ सुरु करुन राष्टभक्तीचे दर्शन घडवले आहे गरीबातील गरीबसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवहानाला सकारात्मक प्रतिसाद देत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत करत आहेत पाथर्डी पंचायत समिती सभापती सुनिता गोकुळ दौंड यांनीही आपले एक महीन्याचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीत कोरोणाग्रस्तांसाठी दिले आहे तसेच पाथर्डी तालुक्यातील हतावर पोट भरणारे शेतमजुर हमाल गोरगरिबांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा किराणा अन्नधान्य देउन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे यातुन त्यांनी देशावर संकट असल्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे समाजातील उच्चप्रस्थ नागरीकांनी गोरगरिब हमाल वाटसरु मजुर यांना जेवण किराणा अन्नधान्य देउन मदत करण्याचे आवाहन भाजपा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment